शिवशंकर चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

शिवशंकर उत्सव मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा

मुंबई :  शिवशंकर उत्सव मंडळाने मुंबई शहर कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रथम श्रेणी राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई येथे आयोजित केली आहे. सदर स्पर्धा २६ ते २९ फेब्रुवारी या कलावधीत रोज सायंकाळ सत्रात पार पडणार आहे. या स्पर्धेत वीस संघ सहभागी होणार आहेत. विजय नवनाथ, विजय बजरंग, केदारनाथ, जय बजरंग, गोल्फादेवी, सुनील, गुड मॉर्निंग आदि प्रमुख संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत शिवशंकर उत्सव मंडळ तब्बल दोन लाख पन्नास हजार रुपयांची बक्षिसे देणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघाला एक लाख रुपये व चषक, उपविजेत्या संघाला पन्नास हजार रुपये व चषक तर उपांत्य पराभूत संघांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये व चषक देऊन गौरवणार आहेत. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला दहा हजार रुपये तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई व पकड करणार्‍या खेळाडूला प्रत्येकी पाच-पाच हजार रुपये देऊन गौरवणार आहेत. या स्पर्धेत दिवसाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूला विशेष परितोषिक देऊन सुध्दा गौरवण्यात येणार आहे.      

 560 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.