…अन मोर्चा ठाण्याच्या वेशिवरच थांबला

आठ दिवसात तोडगा काढण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आश्वासन

ठाणे : आदिवासी बांधवांच्या हिताच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी श्रमजीवी संघाटनेच्या वतीने निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास मोर्चा मुंबईच्या दिशेने कुच करणार होता. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर येत्या आठ दिवसात पुन्हा बैठक बोलवून मागण्यांवर तोडगा काढन्याचे आश्‍वासन दिल्यानंतर या निर्धार मोर्चाचे ठाण्याच्या वेशीवरच समारोप करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात अदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.
श्रमजीवी संघटनेच्यावतीने मंगळवारी निर्धार मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदिवासी माणूस ढोर नाय, माणूस हाय माणूस हाय, या घोषणेसह विविध घोषणांनी ठाणे जिल्हाधिकारी परिसर दुमदूमूण गेला होता. यावेळी या मोर्चात ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवाच्या विविध मागण्यांसह जातीच्या दाखल्यासाठी येणार्‍या अडचणी, वयाची असलेली अट, त्यामुळे शासनाच्या मिळणार्‍या योजनांच्या लाभा पासून वंचित राहावे लागत आहे, स्वातंत्र्यापुर्वी १९३० साली देशामध्ये गावठाणांच्या निर्मीती नंतर शासनाने कुठल्याही प्रकारचा गावठाण विस्ताराचा कार्यक्रम हाती घेण्यात आला नाही, तो हाती घेण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी श्रमजिवी संघटनेच्यावतीने निर्धार मोर्चाचे आयोजन केले होते. याची दखल घेत, मुख्यमंत्री उध्दव ठाकरते यांनी चर्चेचे निमंत्रण संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी विधीमंडळ येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांची श्रमजिवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, संस्थापिका विद्युल्लता पंडित, अध्यक्ष रामभाऊ वारणे सरचिटणीस बाळाराम भोईर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत २०२२ पर्यंत आदिवासी कष्टकर्‍यांना त्यांचे मूलभुत अधिकार देण्याचे मान्य, याबाबत सर्व सचिवांना कालबद्ध कार्यक्रम बनविण्याचे आदेश देण्यात आले, प्रत्येक आदिवासीला दिवाबत्तीसाठी केरोसीन मिळणार, २०२२ पर्यंत प्रत्येक आदीवासीचे हक्काचे घर असेल अशी व्यवस्था करणार, आश्रमशाळांचे आधुनिकीकरण करून तालुका, जिल्हास्तरावर आश्रमशाळा, महाविद्यालय, हॉस्टेल असलेले एक शिक्षण संकुल निर्माण करणार, वन हक्काच्या प्रश्नावर सर्व विभागाच्या सचिवांना डेडलाईनसह कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्याचे मान्य, जातीच्या दाखल्याच्या १९५० सालच्या पुराव्याच्या अटी बाबत अधिकार्‍यांनी आग्रही न राहता, इतर पर्याय वापरून ,वस्तुनिष्ठ पुरावे वापरून दाखले देण्यात यावे असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. यांसह इतर अनेक प्रश्नावर चर्चा करून श्रमजीवी संघघटनेसोबत मुख्यमंत्री ठाकरेंसोबत तपशीलवार चर्चा केली. यावेळी या मागण्या मान्य करण्यात बरोबरच येत्या आठ दिवसात पुन्हा बैठक घेवून समस्यांचे निराकरण करण्याचे आश्‍वासन दिले.


स्वातंत्र्य लढ्याची हीच सुरुवात आहे- विवेक पंडित
मोर्चा निघाल्यानंतर झालेल्या आजच्या बैठकीबाबत विवेक पंडित यांना विचारले असता ते म्हणाले आजची मुख्यमंत्री उद्धवजींसोबत झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक आणि त्यांची सरकारची भूमिका स्वागतार्ह आहे. कालबद्ध कार्यक्रम आणि त्याची अंमलबजावणी ही ठरल्याप्रमाणे होईल अशी अपेक्षा आहे, यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही जागृत राहायला हवे , अंमलबजावणीसाठी कृती कार्यक्रम राबवावा लागेल असे विवेक पंडित यांनी सांगितले. आमची लढाई ही स्वातंत्र्याच्या प्रकाशासाठीची,मूलभूत हक्काची आहे. प्रश्नांवर सरकार सकारात्मक असेल तर सहकार्य असेल अन्यथा आमचा रस्त्यावर उतरून लढण्याचा निर्धार कायम आहे असेही पंडित यांनी सांगितले. पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले.

दरम्यान, आजचा मोर्चा केवळ इशारा नव्हता, आपली ठाण मांडून बसण्याच्या, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकण्याच्या तयारीत आलेलो, म्हणून आज आपण जिंकलो. सरकारने आपले ऐकून घेतले, आपण मागतो त्या मागण्या मान्य करण्याची तयारी दाखवली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात कुणीही उपाशी नको, कुणीही बेघर नको, कुणालाही उपचाराविना मरावे लागु नये, कुणालाही रोजगाराच्या शोधत भटकावे लागू नये हाच स्वातंत्र्याच्या प्रकाशाचा अर्थ आहे. या मागण्या मान्य झाल्यातर स्वागतच आहे, पण जर विश्वासघात झाला तर संघटनेची खरी ताकद सरकारला दाखवू असे सांगत विवेक पंडित यांनी मोर्चाचा समारोप केला.

 699 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.