ठाणे महापौर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये श्री मावळी मंडळ स्कुलचे यश

ठाणे : ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या सौजन्याने ठाणे महानगरपालिवकेच्यावतीने २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान साकेतच्या पोलीस मैदानात संपन्न झालेल्या ठाणे महापौर चषक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. तीन दिवस पार पडलेल्या अ‍ॅथलेटिक्सच्या विविध प्रकारांमध्ये श्री मावळी मंडळ शाळेने १० पदके, एक सांघिक पुरस्कार, उत्कृष्ट खेळ करीत ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि 3 कांस्यपदकांसह सुयश संपादन केले. या स्पर्धेसाठी श्री मंडळ शाळेचे प्रशिक्षक मिलिंद कदम, मिलिंद यादव, दर्शन देवरुखकर, भावेश सर, प्रणय सर आणि निशिकांत सर यांनी मेहनत घेतली.
सत्राच्या पहिल्याच दिवशी साईश जठारने 200 मिटर धावण्याच्या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. त्यानंतर सार्थक जाधवने आठ वर्षाखालील गटात १०० मिटर धावणे तिसर्‍या क्रमांकावर यश संपादन केले. त्याचवेळी आर्यन आणि अभिराज यांनी पदार्पणाच्या आठ वर्षाखालील गटात धावण्याच्या स्पर्धेत संमिश्र यश संपादन केले. दुसर्‍या दिवशी १० वर्षाखालील गटात ८० मिटर धावण्यात हर्ष उतेकरने दुसरे स्थान व साईश जठारला तिसर्‍या स्थानावर यश संपादन करता आले. तिसर्‍या दिवशी रिले रनिंगमध्ये १० वर्षाखालील गटात पहिला क्रमांक व आठ वर्षाखालील गटातदुसर्‍या स्थानावर यश संपादन केले तर हर्ष उतेकरने उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तर प्रगती दामोदर हिने गोळाफेकमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. श्री मावळी मंडळ शाळेच्या अ‍ॅथलेटिक्स संघाने मिळविलेल्या घवघवीश यशाचे श्री मावळी मंडळ शिक्षण संस्था तसेच ठाणेकरांकडून कौतूक होत आहे.

 443 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.