परिवहनमध्ये जाण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी

शिवसेनेची डोकेदुखी वाढणार


ठाणे : मागील दोन वर्षापासून रखडलेली परिवहन समितीची निवडणुक येत्या ४ मार्च रोजी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी शिवसेनेकडून सात, राष्ट्रवादीकडून ४, भाजप २ आणि कॉंग्रेसच्या एका सदस्याने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वास्तविक १२ सदस्य हे परिवहन समितीत निवडून जाणार आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या एकाला आणि कॉंग्रेसच्या एकाला किंवा कॉंग्रेस हा महापालिकेत स्थायी समितीच्या वेळेस शिवसेनेबरोबर असल्याने शिवसेनेला आपला एक उमेदवार मागे घ्यावा लागणार आहे. परंतु यामुळे आता शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

शिवसेनेने निवडणूक लांबवली

मागील दोन वर्षापूर्वी परिवहन समितीमधील सहा सदस्यांचा कार्यकाळ सुंपष्टात आला होता. त्यानंतर पक्षीय बलानुसार परिवहन समिती हातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने सत्ताधारी शिवसेनेने परिवहनची निवडणुक लांबणीवर ठेवली होती. आता दोन वर्षानंतर परिवहनच्या शिल्लक राहिलेल्या 6 सदस्यांचा कार्यकाळही येत्या ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुसार आता ही निवडणुक लावण्यात आली आहे. परिवहन समितीवर एकूण १२ सदस्य निवडले जाणार आहे. त्यानुसार आता येत्या ४ मार्च रोजी ही निवडणुक होणार आहे. त्यासाठी सोमवारी परिवहन समिती सदस्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
पक्षीय बलानुसार शिवसेनेचे सात सदस्य परिवहनमध्ये जानेे अपेक्षित आहे. त्यानुसार शिवसेनेकडून प्रथमच शिवसेनेचे सर्वात जुन्या आणि निष्ठावान शिवसैनिकाला संधी देण्यात आली आहे. यापूर्वी महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत एबी फॉर्म, उमेदवारी अर्ज देण्याचे काम ज्यांच्या खांद्यावर असायचे त्या विलास जोशी यांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. तर अरुण पाटील, प्रकाश कोटवानी, पुजा वाघ, रघुनाथ मोरे यांचे पुत्र मिलिंद मोरे, बालाजी काकडे आणि राजेंद्र महाडीक यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादीकडून तीन सदस्य जाणे अपेक्षित असतांना त्यांच्याकडून शमीम खान, प्रकाश पाटील, मोहसीन शेख आणि नितीन पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपकडून सुरेश कोलते आणि विकास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे कॉंग्रेसने देखील परिवहनमध्ये उडी घेतली आहे. कॉंग्रेसकडून राम भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 503 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.