गाळमुक्त धरण, शिवार ठरले ग्रामीण भागासाठी वरदान

जिल्ह्यातील पाच तालुक्यात ५३ हजार ४१३ घनमीटर पाणी उपलब्ध


ठाणे : ठाणे जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आलेली गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना जिल्ह्यातील ग्रमाण भागासाठी वरदायीनी ठरत आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील ५ तालुक्यातील १२ गावांमध्ये राबविण्यात आलेल्या या योजनेमुळे ५३ हजार ४१३ घनमीटर इतका गाळ काढण्यात आल्यामुळे तितक्याच प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आली.
ठाणे जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण वर्षांनुवर्षे पाणी टंचाई आणि नापिकीच्या झळा शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाव पांड्याना सोसाव्या लागत होत्या. या परिसरात उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र, टँकरने करण्यात असलेला पाणी पुरवठादेखील पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे या गावाची पाण्याची तहान देखील भागात नव्हती. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील जनतेच्या रोजगारावर झाल्यामुळे तेथील अर्थव्यवस्थाही नाजूक झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यात ग्रामीण भागात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यात ही योजना कृषी विभाग, वन विभाग, लघु पाटबंधारेविभाग (जी.प), लघु सिंचन जलसंधारण, भूजल सर्वेक्षण आणि ग्रामीण पाणी पुरवठा आदी विभागांमार्फत प्रभावीपणे राबविण्यात आली
जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १२ गावांमध्ये यंदाच्यावर्षी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात आली. या योजनेतंर्गत १२ गावांमधील गावतलाव, बंधारे, नाला आदी विविध ठिकाणाहून ५३ हजार ४१३ घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे तितक्याच प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे.

विहरीतील पाण्याची पातळी वाढली
दरम्यान, उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्यामुळे विहीरींच्या पाणी पातळीत आणि सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. हातपंप, कुंपनलिका, कपडे धुण्यासह दैनंदिन कामांसाठी या पाण्याचा वापर होत आहे. पाणी जमिनीत जिरून भूगर्भातील पाण्याची पातळीवर येण्यास मदत झाली असून जनावरांनाही तसेच जंगलातील पशुपक्षांना देखील वनराई बंधार्‍यामुळे पाणी उपलब्ध झाले असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक इंदूरकर यांनी दिली.

 522 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.