कोविड काळात मृत्युमुखी पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम व सातव्या वेतन आयोगातील तफावत तातडीने अदा करा

भाजपचे महराष्ट्र प्रवक्ता सुजय पतकी यांची आयुक्तांकडे मागणी.

ठाणे : कोविडच्या कठीण काळामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे योगदान हे अतुलनीय राहिले आहे. या काळात मृत्युमुखी पावलेल्या कर्मचाऱ्यांना आपण कोविड योद्धा असे संबोधले तसेच त्यांचा गौरव देखील केला. ठाणे महापालिकेतील सुमारे ४८ सफाई कर्मचारी कोविड आजाराने कर्तव्य बजावीत असताना दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. परंतु यांच्या काही वारसांना अजूनही पगाराची काही रक्कम देणे थकित आहे. ह्या मध्ये बराच काळ उलटून दिरंगाई झाली असल्याने, ती रक्कम तसेच सातव्या वेतन आयोगातील तफावत रक्कम मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने देण्यात यावी. अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता सुजय पतकी यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना भेटून केली आहे.
आयुक्तांनी यावर अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने प्रक्रिया करू असे आश्वासन दिले तसेच सदर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. यावेळी मृणाल पेंडसे महाराष्ट्र महिला मोर्चा सचिव, निलेश कोळी फ्रेंड्स ऑफ बीजेपी लोकसभा संयोजक, रक्षा यादव, प्रमोदिनी कांबळे, नताशा सोनकर उपस्थित होते.

 6,236 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.