अष्टविनायक चौकात सजलाय स्वराज दिवाळी उत्सव बाजार

ठाण्यातील होतकरू नवउद्योजकांसाठी स्वराज दिवाळी उत्सव बाजाराचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे उपशहर अध्यक्ष आणि स्वराज सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक मनोहर चव्हाण यांनी सांगितले.

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील होतकरू नवउद्योजकांसाठी स्वराज दिवाळी उत्सव बाजाराचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे उपशहर अध्यक्ष आणि स्वराज सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक मनोहर चव्हाण यांनी सांगितले
ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकात असणाऱ्या खुल्या कला दालनात ११नोव्हेंबर पर्यत चालणाऱ्या या  स्वराज दिवाळी बाजार उत्सवाचे उद्घाटन उद्योजक नितिन भोईर व ठाणे शहराध्यक्षा समिशा मार्कंडे यांच्या उपस्थितीत पार पडले.
या बाजारात विश्व हिंदू परिषद गोरक्षा आयाम तर्फे “गोमय उत्पादने, सवलतीच्या दरात ३२”,४०” आणि ४२ इंची स्मार्ट टिव्ही दोन वर्षांच्या वॉरंटीसह, सवलतीच्या दरात  घरगुती फराळ, दिवाळी सजावटीसाठी लागणारे साहित्य, दिवाळीनिमित्त भेट देता येतील अशी चॉकलेट, वेगवेगळ्या डिझाइनचे ड्रेस मटेरियल, सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी, फराळाचे चविष्ठ पदार्थ, वेगवेगळ्या बनावटीच्या पर्स, सुंदर पणत्या, पर्यावरणपुरक दिवाळी आकाशकंदील, आरोग्यविषयक आयुर्वेदिक उत्पादने, विविध प्रकारचे घरगुती मसाले यांची विक्री दालने आहेत. नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठया संख्येने या बाजारास भेट द्यावी असे आवाहन स्वराज महिला मंडळाच्या अध्यक्षा सविता म. चव्हाण यांनी केले आहे.

 6,368 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.