`ड्रेझर’ विरोधात भूमिपुत्र, आदिवासी मजुरांचा एल्गार

डुबी पद्धतीने रेती काढणाऱ्या भूमिपुत्र,आदिवासी मजूरांनी १५० बोटींसह खाडीपात्रात केले आंदोलन 

 ठाणे : ड्रेझर' विरोधात डुबी पद्धतीने रेती काढणाऱ्या हजारो भूमिपुत्र आणि आदिवासी मजूरांनी १५० बोटींसह आज खाडीपात्रात उतरुन आंदोलन केले.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी व ठाणे तालुका यांचे मध्यात उल्हास नदीच्या खाडीकिनारी दोन्ही बाजूला कशेळी ते गायमुखपर्यंत ३० ते ३५गावे वसलेली आहेत. १९६०पासून येथील स्थानिक भूमिपुत्र शेतीला जोडधंदा म्हणून पारंपारिक डुबी पद्धतीने रेती काढण्याचा व्यवसाय करत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनी हा भाग स्थानिकांसाठी राखीव ठेवला आहे. या व्यवसायावर या भागातील भूमिपुत्र आणि आदिवासी मजूर अशा २० ते २५ हजार जणांची उपजीविका चालते. जव्हार, वाडा, मोखाडा, पालघर या कुपाषित भागातील बेरोजगार, आदिवासी बांधवांची या व्यवसायावर उपजीविका आहे. मात्र आता ड्रेझर्सला (यांत्रिकी पद्धतीने) रेती काढायला परवानगी देण्यात आली आहे. या शासन निर्णयामुळे स्थानिकांमध्ये मोठा असंतोष आहे. या पट्ट्यामध्ये विकासाच्या नावाखाली आता जल वाहतूक करण्यासाठी ड्रेझर्सने उत्खनन केले जात आहे. यामुळे या भागातील २० ते २५हजार भूमिपुत्र व कुपोषित भागातील हजारो आदिवासी बांधव बेरोजगार होणार आहेत. या पट्ट्यात शेकडो वर्षांपासून डुबी मारून साधारण ५०पेक्षा अधिक फूट खोल खाडी पात्र झालेले आहे. तसेच याच भागातून २०० ते २५०टनाच्या बार्जेस जात असताना निमित्त साधून खोली करण्याच्या नावाखाली धनदांडग्यांच्याड्रेझर’ परवानगी देऊन श्रीमंतांना अजून श्रीमंत करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप भूमिपुत्रांनी केला आहे.  
`ड्रेझर’ ने उत्खनन करून काढलेली रेती ड्रेझर्स वाल्यांकडून २४०० रूपये ब्रासने महसूल खाते खरेदी करून ६६० रूपये ब्रास भावाने बाजारात विकणार आहे. तरी एका ब्रास साठी १७४० रूपये तोटा सरकार सहन करणार आहे. हे कोणासाठी तर श्रीमंतांसाठी सरकार एवढा करोडो रुपयांचा तोटा सहन करणार आहे. यामध्ये मासिक कोट्यवधी रुपये तोटा होणार आहे. तो कोणासाठी ? असा सवाल करण्यात येत आहे.
या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज कशेळी ते गायमुख खाडीच्या मधोमध जिथे ड्रेझर उभी आहे त्या ठिकाणी (नागला बंदर खाडी पात्र) घेराव घालून काळे झेंडे दाखविण्यात आले.  यावेळी भिवंडी तालुका रेती तांडेल मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील, चेअरमन सनातन पाटील, उपाध्यक्ष गोरख जोशी, विजेंद्र तरे, भगीरथ म्हात्रे, मधुकर पाटील, राजन पाटील,दीपक पाटील, मधुकर मोघर तसेच हजारों मजुर, शेतकरी, व तांडेल उपस्थित होते.

 132 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.