विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची बीजे
शिक्षकांनी रुजवावीत : रविंद्र चव्हाण

वसंतराव डावखरेंच्या स्मृतिप्रित्यर्थ कोकणातील ११ संस्थाचालक व १६५ शिक्षकांना पुरस्कार

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी दूरदर्शी व लोकहिताचा विचार करणारे राजकीय व्यक्तिमत्व शिक्षकांनीच घडविले आहे. आगामी काळात जात बाजूला ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची बीजे रुजवावीत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले. विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे स्मृत्यर्थ देण्यात येणारा शिक्षक पुरस्कार हा कोकणात बेंचमार्क झाला आहे, अशा शब्दांत चव्हाण यांनी पुरस्काराचे कौतुक केले.
विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील १६५ आदर्श शिक्षक व ११ संस्थाचालकांचा वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आज सन्मान करण्यात आला. ठाण्यातील एम. एच. हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते. तर आमदार निरंजन डावखरे स्वागताध्यक्ष होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, मााजी आमदार अजित गोगटे, जनरल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन उल्हास कोल्हटकर, माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, भरत चव्हाण, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. प्रशम कोल्हे, सहसंयोजक विकास पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एन. एम. भामरे, कोकण पदवीधर प्रकोष्टचे संयोजक सचिन बी. मोरे, रमेश आंब्रे, डॉ.राजेश मढवी, समीरा भारती, स्नेहा पाटील, किशोर पाटील, संजय महाजन, शेखर कुलकर्णी, संगिता विसपुते, नितीन खर्चे, एस. एस. पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित करून मॉडर्न पेंटथलॉन क्रीडा प्रकारात सहा सुवर्ण व एक कांस्य अशी सात पदके पटकावणाऱ्या जलतरणपटू मयंक वैभव चाफेकर याचाही गौरव करण्यात आला.
वसंतराव डावखरे स्मृत्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्कार हा कोकणातील शैक्षणिक क्षेत्रातील बेंचमार्क झाला आहे, अशी भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “शिक्षकांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार हा शिक्षकांमधील अष्टपैलूत्व तेजोमय करणारा आहे. या पुरस्काराची उंची शिक्षकांनी वाढवावी. देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांकडे आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनातील अडचणी, बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शिक्षकांनी मार्गदर्शन करावे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. त्यात प्रत्येकाने आपले योगदान देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
कोकणात नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थी हितासाठी दक्ष असलेले आदर्श शिक्षक आणि प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या संस्थाचालकांचा गौरव व्हावा, यासाठी २०१८ पासून वसंतस्मृती शिक्षक पुरस्कार सोहळा सुरू केला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले, याचा आनंद वाटत आहे. संस्थाचालक, शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार दिले जातील, अशी घोषणा आमदार निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविकात दिली.
या वेळी काही पुरस्कारविजेत्या शिक्षकांनीही आपल्या भावना व्यक्त केला. वसंतराव डावखरे शिक्षक पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला प्रोत्साहन मिळाले. शैक्षणिक प्रसारासाठी आम्हाला नवे बळ व ऊर्जा मिळाली, असे पुरस्कारविजेत्यांनी भाषणात सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी कोकण विभाग संयोजक किशोर पाटील, सहसंयोजक विनोद शेलकर, जिल्हा संयोजक संभाजी शेळके, सुभाष सरोदे, रमेश शर्मा, मुकेश पष्टे, राजकुमार देसाई, सुशीलकुमार दुबे, संकुल पाठक, चंद्रकांत खुताडे, हिरामण कोकाटे, किसन पाटील, आनंद शेलार, प्रसन्ना देसाई यांनी मेहनत घेतली.

 2,544 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.