सुहास देसाई यांना खुले आव्हान आहे की येत्या २४ तासात त्यांनी माझ्यावर उघड आरोप करावेत. त्याचे योग्य ते उत्तर द्यायला मी समर्ध – आनंद परांजपे
ठाणे : कालची पत्रकार परिषद ही डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बोलवून प्रत्यक्षात सुहास देसाई व शानू पठाण हे या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावरुनच त्यांची राजकीय विश्वासार्हता व राजकीय विद्वत्ता दिसून येते. मुळात पत्रकार परिषद घेतली शिवसेना प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे यांच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी आणि घसरले माझ्यावर, यातुनच सुहास देसाई यांची बौद्धिक विकलांगता आढळून आली आहे तर शानू पठाण यांनी माझ्यावर आरोप करताना त्यांचे मराठी कच्चे असल्याचे दिसून आले. यामुळे मी काय बोललो ते त्यांनी प्रथम नीट समजून घ्यावे. मी माझ्याच नावाने पत्रकार परिषद घेतो व पत्रकारांना मीच उघडपणे सामोरे जातो, असा उपरोधिक हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना चढविला.
शारिरीक विकलांग व्यक्तींबाबत आपणांस संवेदना व सहानुभूतीची भावना असते. पण सुहास देसाई यांनी माझ्यावर जे आरोप केले ते पाहता सुहास देसाई हे बौद्धिक विकलांग आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्यावर बोलताना सुहास देसाई म्हणाले की, आनंद परांजपे यांच्याविषयी अनेक पुरावे आहेत, ते बाहेर काढले तर त्यांना सळो की पळो होईल. माझे सुहास देसाई यांना खुले आव्हान आहे की येत्या २४ तासात त्यांनी माझ्यावर उघड आरोप करावेत. त्याचे योग्य ते उत्तर द्यायला मी समर्ध आहे. खरेतर शिवसेना प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचे छायाचित्र दाखविले, मनिषा कायंदे यांना उत्तर देण्याऐवजी माझ्यावर घसरण्याची त्यांना गरज नव्हती. मुळात पत्रकार परिषद बोलावली डाॅ जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने आणि पत्रकार परिषद घेतात सुहास देसाई व शानू पठाण, ही यांची विद्वत्ता. मुळात मी पत्रकारांशी बोलताना, डाॅ. जितेंद्र आव्हाड व शानू पठाण यांचे छायाचित्र दाखवून कोणी आरोपी होत नाही, असे स्पष्टपणे म्हटले होते. सुहास देसाई व शानू पठाण यांनी. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचे सलमान फाळके याच्याबरोबरचे छायाचित्र पत्रकार परिषदेत दाखविले होते, हे छायाचित्र २०१७ साली नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला सलमान फाळके आला होता ते फेसबुकवरचे छायाचित्र आहे. आम्ही ते नाकारत नाही. मुळात मी पत्रकारांशी बोलताना, डाॅ. जितेंद्र आव्हाड व शानू पठाण यांचे छायाचित्र दाखवून कोणी आरोपी होत नाही, असे मीच स्पष्टपणे म्हटले होते. खरतर राजकीय नेत्यांचे अशी छायाचित्रे हा काही पुरावा होत नसल्याचे माझे स्पष्ट मत आहे. खरेतर पोलिसांकडे कोणत्याह प्रकारचा पुरावा असेल तर त्यांनी कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो, तो ड्रग्ज तस्कर सलमान फाळकेला मदत करत असेल तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील पोलिसांनी चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. पण सुहास देसाई हे मुळातच बौद्धिक विकलांग असल्याने त्यांना हे कळलेले दिसत नाही तर शानू पठाण यांची मराठी कच्ची असल्याने त्यांना मी काय बोललो ते नीट समजलेले नसावे, माझे आजवरचे राजकीय आयुष्य हे निष्कलंक, स्वच्छ असल्ताने माझ्यावर राजकीय, आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत, असे स्पष्टीकरण आनंद परांजपे यांनी दिले.
डिलिमिटेशन होण्याअगोदर शेवटच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मी खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. तर डिलिमिटेशन झाल्यानंतर पहिल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा पहिला खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. लोकसभेत ५४३ निवडून आलेले खासदार असतात तर राष्ट्रपती नामंतकित असे २ खासदार असतात व त्यांची कालमर्यादा ५ वर्षे तर राज्यसभेत २३३ विधानसभेतुन निवडलेले खासदार असतात तर १२ राष्ट्रपती नियुक्त खासदार, अशी खासदारांची संख्या असते व त्यांची कालमर्यादा ६ वर्षे असते. असे असतानाही मी दीडवर्षे खासदार असल्याचा आरोप सुहास देसाई यांनी करुन आपण बौद्धिक विकलांग असल्याचे सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०१२ साली मी सामिल झालो होतो. २३ जून २०१६ साली शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. आजपर्यंत ती जबाबदारी मी समर्धपणे पार पाडत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या पार्लमेंटरी बोर्डाने मला दोनवेळा २०१४ कल्याण व २०१९ ठाणे लोकसभेचे तिकीट दिले होते. आता कोणत्या निकषाने ते दिले याचे उत्तर आदरणीय पवारसाहेबांना सुहास देसाई यांनी विचारावे. खरेतर मी सुहास देसाई आणि शानू पठाण यांना महत्व देत नाही. मी आजही राष्ट्रवादी मध्येच आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून मी पक्ष सोडून गद्दारी केली, शरदचंद्र पवारसाहेबांचा विश्वासघात केला, असे म्हणणे मूर्खपणाचे लक्षण आहे. आजही मी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम करीत आहे. ज्यावेळी डाॅ जितेंद्र आव्हाड माझ्यावर, मी पक्ष सोडून गद्दारी केल्याचा, विश्वासघाताचा आरोप करतील तेव्हा त्याचे त्याच भाषेत मी उत्तर देईन, असा इशाराही आनंद परांजपे यांनी यावेळी दिला.
15,537 total views, 2 views today