मुंबई चॅम्पियनशिप टी – २० लीग क्रिकेट स्पर्धा २५ ऑक्टोबरपासून

स्पर्धेत अठ्ठेचाळीस संघांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यात मुंबई विभागातील २४ तर ठाणे, पुणे आणि रायगड विभागातील प्रत्येकी आठ संघाचा समावेश आहे.

ठाणे : जवळपास सुमारे सहा लाख रुपयांची रोख बक्षिसे हे कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित दुसऱ्या मुंबई चॅम्पियनशिप टी – २० लीग क्रिकेट स्पर्धेचे वैशिष्ट्य असणार आहे. २५ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत अठ्ठेचाळीस संघांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यात मुंबई विभागातील २४ तर ठाणे, पुणे आणि रायगड विभागातील प्रत्येकी आठ संघाचा समावेश आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला तिन लाख ,उपविजेत्या संघाला एक लाख पन्नास हजार, तृतीय क्रमांकाच्या संघाला ७५ हजार आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला ३५ हजार रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. याशिवाय सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस १० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल. स्पर्धेतील सामने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सुरुवातीला साखळी आणि नंतर बाद पद्धतीने खेळवण्यात येतील.

 447 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.