राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री अजितदादा पवार सोशल फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेचे उपाध्यक्ष, प्रवक्ता आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष अशा तीन महत्वपूर्ण पदांवर अजय विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईच्या मनोहर विचारे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय मनोहर विचारे यांनी सामाजिक क्षेत्रात अनोखी हॅटट्रिक साधली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री अजितदादा पवार सोशल फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेचे उपाध्यक्ष, प्रवक्ता आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष अशा तीन महत्वपूर्ण पदांवर अजय विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अजय विचारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजीव सदस्य, प्रभाग क्रमांक १८ चे माजी अध्यक्ष, ऑपेरा हाऊस तालुका माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सरचिटणीस (अल्पसंख्याक विभाग) अशा विविध पदांवर कार्यरत होते. मुंबई महापौर पुरस्काराचेही ते मानकरी ठरले होते.
नविन नियुक्तीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, श्री अजितदादा पवार सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज तंतरपाळे, महाराष्ट्र प्रदेश महिलाध्यक्षा माया शिरसाट, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल उके, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता अवधुत शिरसाठ, जेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, विचारे प्रतिष्ठानच्या मराठी गौरव पुरस्काराचे मानकरी आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू प्रमोद ठाणेकर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
307 total views, 2 views today