दुसऱ्या फेरीच्या लढतीत निलयला फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. निलयने बिगर मानांकित आदित्य फडकेचा ११-१, ११-१-११-५ असा फडशा पाडला.
ठाणे : दुसऱ्या मानांकित ठाण्याच्या निलय पट्टेकरने सोप्या विजयासह रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, सीकेपी सोशल क्लब आणि सीकेपी ज्ञाती गृह ट्रस्ट आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन टेबल टेनिस स्पर्धेतील १३ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात आपली आगेकूच कायम राखली आहे.
दुसऱ्या फेरीच्या लढतीत निलयला फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. निलयने बिगर मानांकित आदित्य फडकेचा ११-१, ११-१-११-५ असा फडशा पाडला. या गटातील अन्य लढतीत तिसरे मानांकन मिळालेल्या ठाण्याच्या प्रतीकउ तुलसानीने कोल्हापूरच्या बिगर मानांकित आयुष पाटीलचे आव्हान ११-६,११-६,११-७ असे परतवून लावले. तर ठाण्याच्या पार्थ भानुशालीने पुण्याच्या रणवीर निकमची वाटचाल ७-११, ११-५,११-५,११-४ अशी संपुष्टात आणली.
मुलांच्या १९ वर्षाखालील वयोगटाची अंतिम लढत मुंबई उपनगरच्या सागर कस्तुरे आणि नाशिकच्या कुशल चोपडा यांच्यात रंगेल. उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकन मिळालेल्या सागरने नागपूरच्या पाचव्या मानांकित आदी चिटणीसचा प्रतिकार १३-११,२-११,८-११,११-५, ११-५ असा मोडीत काढला. तर कुशलने दुसऱ्या मानांकित मुंबई उपनगरच्या जश मोदीवर ११-५, ६-११, ११-४, ५-११ असा विजय मिळवत निर्णायक फेरीत स्थान मिळवले.
21,116 total views, 1 views today