समाजातील प्रत्येक घटकातील रुग्णांवर करणार शासकीय आणि खाजगी रुग्णालयांत मोफत उपचार
ठाणे : विविध शासकीय योजनांची माहिती नसल्याने गरजू रुग्णांची होणारी परवड तेवढीच वेदनादायी असते. या पार्श्वभूमीवर भारतीय मराठा महासंघाने समाजातील प्रत्येक घटकातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. रुग्णांना चांगल्या रूग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी भारतीय मराठा महासंघातर्फे एक कक्ष सुरू करण्यात आला असून या कक्षामार्फत रुग्णांवर शासकीय आणि खाजगी रुग्णालयांत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे भारतीय मराठा महासंघाचे ठाणे शहर अध्यक्ष महेश प्रभाकर मोरे यांनी सांगितले. या कक्षमार्फत रुग्णांना किडनीचे विकार, हृदयरोग आणि डोळ्यांच्या विकारावर शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार आणि आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया करून देण्यात येतील. गरजू रुग्णांनी आधार कार्ड, रेशनकार्डसह कृष्णा यादव यांच्याशी संध्याकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत बँक ऑफ बडोदाजवळ, राम मारुती मार्ग, येथे किंवा ८५९१९८४५०१ या क्रमांकावर सकाळी १० ते ५ या वेळेस संपर्क साधावा असे आवाहन महेश प्रभाकर मोरे यांनी केले आहे.
52,926 total views, 1 views today