मुंबई शरीरसौष्ठव संघटनेच्या पाठीशी शरीरसौष्ठवपटूंची ताकद

खेळाडूंच्या पुरस्कारांसाठी संघटनेच्या निर्णयाला शरीरसौष्ठवपटूंचा पाठिंबा

मुंबई : महाराष्ट्रच नव्हे भारतात शरीरसौष्ठवाची खरी ताकद म्हणजे मुंबईतील शरीरसौष्ठव संघटना आणि शरीरसौष्ठवपटू. गेली दहा वर्षे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून वंचित राहलेल्या शरीरसौष्ठवपटूंना पुरस्कार मिळवून देण्यासाठी चेतन पाठारेंच्या संघटनेला सोडण्याचा मुंबईतील शरीरसौष्ठव संघटनांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाच्या पाठीशी मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंची अख्खी ताकद उभी राहिली आहे.
गेली दहा वर्षे मुंबईसह महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर अभूतपूर्व कामगिरी करत आहेत. तरीही महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनला आपल्या एकाही दिग्गज खेळाडूला पुरस्कार मिळवून देता आलेले नाही. त्यामुळे खेळाडूंच्या भल्यासाठी आणि त्यांना पुरस्कार मिळवून देण्यासाठी मुंबई शरीरसौष्ठव क्षेत्रातील बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेच्या सर्वच्या सर्व पदाधिकार्‍यांनी राज्य बॉडीबिल्डिंग संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या या निर्णयाबाबत खेळाडूंच्या मनात भीतीचे वातावरण होते. मात्र महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स संघटनेचे सर्वेसर्वा संजय मोरे यांच्यात सामील झाल्यामुळे मुंबईतील शेकडो दिग्गज खेळाडू निश्ंिचत झाले होते आणि त्यांनी मुंबई संघटनेला आपला पाठिंबा दर्शवत आपली पूर्ण ताकद त्यांच्यासोबत उभी केली आहे.

मुंबई शरीरसौष्ठव संघटनेची वाढली ताकद
महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनशी संलग्न झाल्यामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा परिषदेची मान्यता. या मान्यतेमुळे आता मुंबईतील शरीरसौष्ठवपटूना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळू शकणार.
इंडियन बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशनला ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाची मान्यता असल्यामुळे एशियन बीच गेममध्येही सहभागी होता येणार.
इंडियन बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशन ही इंटरनॅशनल फिटनेस आणि बॉडीबिल्डिंग फेडरेशनला वाडा, स्पोर्ट्स अ‍ॅकॉर्ड, वर्ल्ड गेम असोसिएशन यांची मान्यता असलेली शरीरसौष्ठव क्षेत्रातील एकमेव संघटना.

सव्वाशे शरीरसौष्ठवपटूची फौज सोबत
मुंबईतील शरीरसौष्ठव संघटनांनी खेळाडूंना पुरस्कार मिळवून देण्यासाठी संजय मोरेंच्या मान्यताप्राप्त संघटनेशी आपली संघटना संलग्न करताच त्यांनी सत्यस्थिती सांगण्यासाठी मुंबईतील सर्वच शरीरसौष्ठवपटूंना बोलावले. तेव्हा मुंबईतील सव्वाशेपेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंची उपस्थिती भारावून सोडणारी होती. खेळाडूंच्या न्यायासाठी मुंबईतील संघटनांनी उचललेल्या घेतलेल्या भूमिकेला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला आणि हम तुम्हारे साथ हैचा विश्वासही दिला. यात खेळाडूंमध्ये शाम रहाटे, अनिल राऊत, सागर कातुर्डे, नितीन म्हात्रे, विक्रांत देसाई, रोहन धुरी, अतुल आंब्रे, निलेश दगडे, जालिंदर आपके, अनिल बिलावा, रसल दिब्रिटो, सुदर्शन खेडेकर यांच्यासारखे शेकडो खेळाडू उपस्थित होते. या सर्व खेळाडूंना एकत्रितपणे एका मंचावर आणण्याची मोलाची जबाबदारी मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत, उपनगर संघटनेचे अध्यक्ष किट्टी फनसेका तसेच राजेश निकम, संजय चव्हाण, जयदीप पवार यांनी चोख पार पाडली

आता कसलीच भीती नाही….
आम्ही खेळाडूंच्या हितासाठी घेतलेला निर्णय त्यांना पटेल का अशी मनात भीती होती, पण आम्ही एक आवाज देताच मुंबईची शरीरसौष्ठवपटूंचा ताकद ज्या जोशात आमच्या पाठिशी उभी राहिली, ते पाहून आता कसलीच भीती उरली नाही. आता त्यांना न्याय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ देऊनच आम्ही धीर धरणार.
अजय खानविलकर, अध्यक्ष (बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना

खेळाडूंना पुरस्कार मिळवून देण्याचेच स्वार्थ
आम्ही खेळाडूंसाठी पूर्ण संघटना संजय मोरेंच्या संघटनेशी संलग्न केली तेव्हा अनेकांनी आमच्यावर आरोप केले. हे सारे आम्ही स्वार्थासाठी केल्याची बोंबाबोंब सुरू केली. पण मी सांगतो, खेळाडूंना पुरस्कार मिळवून देणे, हेच यामागचे आमचे स्वार्थ आहे. आणि हा स्वार्थ आम्ही खेळाडूंसाठी नक्कीच साधू. ज्या स्वार्थासाठी आम्ही जे पाऊल उचलले, ते खेळाडूंना पुरस्कार मिळवून दिल्यानंतर आणखी वेगाने धावेल.
विशाल परब, सरचिटणीस (उपनगर शरीरसौष्ठव संघटना)

सहनही होत नव्हते, सांगता येत नव्हते…
मी पंधरा वर्षे खेळलोय आणि गेले २० वर्षे संघटनेसाठी झटतोय. पण गेली १०-११ वर्षे आमचे खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी करत असूनही त्यांनी शिवछत्रपती पुरस्कार मिळत नव्हता. तो पुरस्कार का मिळत नाही, याची आम्हाला माहितीही दिली जात नव्हती. मी स्वता खेळाडू असल्यामुळे मला खेळाडूंवर होणारा अन्याय सहनही होत नव्हता आणि सांगताही येत नव्हता. अखेर आम्ही सर्वांनी मिळून खेळाडूंच्या हितासाठी चेतन पाठारेंच्या संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतला.
सुनील शेगडे, उपाध्यक्ष ( उपनगर शरीरसौष्ठव संघटना)

नोकरी नाही, किमान पुरस्कार तरी मिळावा
मी आजवर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सुवर्ण पदक जिंकलेय, पण माझे पुरस्कार मान्यताप्राप्त संघटनेकडून नसल्यामुळे नेहमीच हुकत होते. त्यामुळे मला कधी नोकरीही लाभली नाही, पण आता किमान पुरस्काराने माझ्या कामगिरीचा गौरव व्हावा अशी अपेक्षा आहे आणि जी संघटना आमच्या गौरवासाठी झटतेय, त्यांच्यासोबत राहाणे, हे आमचे कर्तव्य आहे.
नितीन म्हात्रे, आतंरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू

पुढच्या पीढीसाठी संघटनेसोबत
माझी गुणवत्ता आणि कामगिरी असूनही मला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला नाही. मला पुरस्कार मिळाल्याचे माझ्या कानावरही पडले होते, पण सकाळपर्यंत माझा पुरस्कार कोणत्यातराr दुय्यम खेळाडूने माझ्याकडून हिसकावून घेतला होता. हे दुख फारच वाईट आहे. मला नाही मिळालं, पण माझ्याबरोबर खेळासाठी आपला घाम गाळत असलेल्या नव्या पिढीला तो सन्मान मिळवून देण्यासाठी आमची संघटना धडपडतेय. त्यांच्यासोबत मी आताही आहे आणि पुढेही असेन.
सागर कातुर्डे, आतंरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू

 143 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.