मुंडे स्पोर्ट्स, एसआरआय-डब्ल्यूआरएलपीबी अंतिम फेरीत

उपांत्य फेरीत मुंडे स्पोर्टसने ऍग्रीबिड क्रिकेट क्लब तर एसआरआय-डब्ल्यूआरएलपीबी संघाने ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्सवर विजय मिळवला.

मुंबई : मुंडे स्पोर्टसने ऍग्रीबिड क्रिकेट क्लबचा ५७ धावांनी पराभव करत कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी-२०लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. निर्णायक लढतीत त्यांचा सामना ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्सचा सात विकेट्सनी पराभव करणाऱ्या एसआरआय-डब्ल्यूआरएलपीबी संघाशी होईल.
उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत मुंडे स्पोर्टसने प्रथम फलंदाजी करताना ऍग्रीब्रीड क्रिकेट क्लबसमोर २० षटकात ७ बाद १४५ धावांचे आव्हान उभे केले होते. संघाच्या धावसंख्येला आकार देताना सचिन यादवने ६३ धावांची अर्धशतकी खेळी केली. आकाश पारकरने ४४ धावांचे योगदान दिले. विश्वेश्वरने २२ धावांत ३ फलंदाज बाद केले. त्यापाठोपाठ मिलिंद मांजरेकरने दोन, तनुष कोटियन आणि मुन्ना यादवने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
विजयाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऍग्रीब्रीड क्रिकेट क्लबचा डाव १६.५ षटकात अवघ्या ८५ धावांवर आटोपला. पराभुत संघाकडून सागर मिश्रा (१९) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. संघाला अंतिम फेरीचा दरवाजा उघडून देताना रितेश तिवारीने तीन, आकाश पारकर, सूरज लालवानी आणि पुष्कराज चव्हाणने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
अन्य लढतीत ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स संघाने एसआरआय-डब्ल्यूआरएलपीबी संघासमोर विजयासाठी २० षटकात ९ बाद १४९ असे लक्ष्य दिले होते. एसआरएल-डब्ल्यूआरएलपीबी संघाने तीन फलंदाजांच्या मोबदल्यात १७.३ षटकात १५१ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. जिगर राणाने ५२ आणि कुंचिकरने ४३ धावा करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. कर्णधार विनायक भोईरने नाबाद ३१ धावा केल्या. त्याआधी यश देसाईच्या ७५ धावांच्या खेळीमुळे ओम्नी ग्लोबल स्पोर्टसला समाधानकारक धावसंख्या उभारता आली. या डावात विजयी संघाच्या सौरभ शर्मा, हितेश आणि अक्षय रेडकरने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. विनायक भोईर आणि ह्रितीक पाटीलने प्रत्येकी एक विकेट मिळवली होती.

 181 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.