धृमिलने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत जे. व्ही. स्पोर्ट्स संघाला ८४ धावांवर गुंडाळले.
मुंबई : धृमिल मटकरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंडे स्पोर्ट्सने जे.व्ही. स्पोर्ट्सचा सहा विकेट्सनी पराभव करत कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी – २० लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
धृमिलने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत जे. व्ही. स्पोर्ट्स संघाला ८४ धावांवर गुंडाळले. धृमिलने ४ षटकात १६ धावांच्या मोबदल्यात ५ फलंदाज बाद केले. सिद्धेश जाधव (२५) आणि अखिलेश बराईचा (१५) अपवाद वगळता जे.व्ही.स्पोर्ट्सच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्येपर्यंत पोहचता आले नाही. धृमिलच्या जोडीने परिक्षित वळसंगकर, रितेश तिवारी, वसंत मुंडे आणि शशिकांत कदमने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
उत्तरादाखल परिक्षित वळसंगकर आणि नीरज जाधवने संघाला चांगली सुरुवात करुन दिली.पण हे दोघे बाद झाल्यावर आणखी दोन विकेट्स झटपट गमावल्यामुळे मुंडे स्पोर्ट्सचा संघ अडचणीत आला होता. पण, मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुढे नुकसान होऊ न देता संघाचा विजय निश्चित केला. परिक्षितने सर्वाधिक २३ आणि विराज जाधवने २२ धावा केल्या. यासिन शेख आणि शशांक जाधवने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक : जे.व्ही.स्पोर्ट्स : १८.२ षटकात सर्वबाद ८४ ( सिद्धेश जाधव २२, अखिलेश बराई १५, धृमिल मटकर ४-१६-५, परिक्षित वळसंगकर ४-१९-१, रितेश तिवारी १-६-१, वसंत मुंडे २-११-१, शशिकांत कदम ०.२-०-१) पराभुत विरुद्ध मुंडे स्पोर्ट्स : ९.५ षटकात ४ बाद ८५ (परिक्षित वळसंगकर २३, विराज जाधव २२, सूरज लालवानी १०, सचिन यादव ११, यासिन शेख ३.५ – ३५-२, शशांक जाधव २-११-२). सामनावीर – धृमिल मटकर.
88 total views, 1 views today