सेंट्रल मैदानावर झालेल्या सामन्यात सेंच्युरी रेयॉन संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुकंद संघाला १०.३ षटकात अवघ्या ३८ धावांत गुंडाळले.
ठाणे : सेंच्युरी रेयॉन संघाने मुकंद संघाचा आठ विकेट्सनी पराभव करत ४७ व्या ठाणेवैभव आंतर कार्यालयीन ३५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील आगेकूच कायम राखली.
सेंट्रल मैदानावर झालेल्या सामन्यात सेंच्युरी रेयॉन संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुकंद संघाला १०.३ षटकात अवघ्या ३८ धावांत गुंडाळले. प्रत्येकी ९ धावा करणारे मयांक दीक्षित आणि नवनाथ घनवट संघासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. आशुतोष माळीने ३, प्रदीप पांडे आणि आनंद भालेरावने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. उत्तरादाखल सेंच्युरी रेयॉन संघाने पाचव्या षटकांतील चौथ्या चेंडूवर ४१ धावांनीशी विजय मिळवला. दिनेश यादवने नाबाद १५ आणि रोशन जाधवने १४ धावा केल्या. सागर शिंदे आणि धीरज गव्हाणेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
संक्षिप्त धावफलक : मुकंद : १०.६ षटकात सर्वबाद ३८ (मयांक दिक्षित ९, नवनाथ घनवट ९, आशुतोष माळी ३-६-३, प्रदीप पांडे २-२-२, आनंद भालेराव १-२-२) पराभूत विरुद्ध सेंच्युरी रेयॉन : ४.४ षटकात २ बाद ४१ ( दिनेश यादव नाबाद १५, रोशन जाधव १४, सागर शिंदे २-१९-१, धिरज गव्हाणे २-७-१).
21,360 total views, 1 views today