वैभव माळीची अष्टपैलू कामगिरी

वैभवाच्या जोडीने प्रथमेश डोके आणि अक्ष पारकरने अचूक गोलंदाजी करत विजय शिर्के क्रिकेट क्लबच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले.

ठाणे : गोलंदाजीत ९ धावांत २ विकेट्स आणि नाबाद ३७ धावांची खेळी करणाऱ्या वैभव माळीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर एस आर ग्रुपने विजय शिर्के क्रिकेट क्लबचा सहा विकेट्सनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित टिपीएल – मुख्यमंत्री चषक टी -२० क्रिकेट लीग स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत कूच केले. विजय शिर्के क्रिकेट क्लबचे ९१ धावांचे आव्हान एस आर ग्रुपने ८.१ षटकात ९५ धावांसह पार केले.
पहिल्या डावात वैभवाच्या जोडीने प्रथमेश डोके आणि अक्ष पारकरने अचूक गोलंदाजी करत विजय शिर्के क्रिकेट क्लबच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले. या तिघांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. पृथ्वीक पंडित (२८), अथर्व अंकोलेकर (२२) आणि सत्यलक्ष जैनने ११ धावांचे योगदान दिले.
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विजयाच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या एस आर ग्रुपच्या चार फलंदाजांना झटपट बाद करत विजय शिर्के क्रिकेट क्लबने सामन्यात चुरस निर्माण केली. मोक्याच्या क्षणी वैभवसह आनंद बैसने २८ आणि सागर मिश्राने २१ धावा करत संघाचा विजय निश्चित केला. अथर्व डाकवेने दोन , अथर्व अंकोलेकर आणि संकेत गोसावीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
संक्षिप्त धावफलक : विजय शिर्के क्रिकेट क्लब : १७.४ षटकात सर्वबाद ९१ ( पृथ्वीक पंडीत २८, अथर्व अंकोलेकर २२, सत्यलक्ष जैन ११, वैभव माळी ३-९-२, प्रथमेश डाके ३.४-१-१७-२, अक्ष पारकर ३-७-२, सक्षम झा ३-१३-१, शशांक अत्तरडे ३-३२-१, सागर मिश्रा २-११-१) पराभूत विरुद्ध एस आर ग्रुप : ८.१ षटकात ४ बाद ९५ ( वैभव माळी नाबाद ३७, आनंद बैस २८, सागर मिश्रा २१, अथर्व डाकवे ३-४६-२, अथर्व अंकोलेकर ४-१९-१, संकेत गोवारी १-२६-१).

 10,718 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.