१ मे पासून क्यू३ आणि क्यू३ स्पोर्टबॅक १.६ टक्क्यांनी महागणार
मंबई : लक्झरी कार बनवणारी जर्मनीची कंपनी ऑडीने क्यू३ आणि क्यू३ स्पोर्टबॅकच्या किंमतीमध्ये १.६% वाढ करीत असल्याची घोषणा केली. ही वाढ १ मे २०२३ पासून लागू होईल. कंपनीने ऑडी क्यू८ सेलिब्रेशन, आरएस५ आणि एस५ च्या किंमतीत अलीकडेच २.४ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती.
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों यांनी सांगितलं की, “ऑडी इंडियामध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो परंतु सीमाशुल्क आणि उत्पादन खर्चातील वाढीचा परिणाम भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. कंपनीने विविध पातळ्यांवर किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी, सध्याच्या परिस्थितीमुळे किमतीत वाढ होणे आवश्यक आहे.”
274 total views, 1 views today