कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशन अजिंक्य

पद्माकर तालीम ढाल क्रिेकेट
मुंबई : राकेश प्रभूचा भेदक मारा आणि त्यानंतर शॉन रॉड्रिग्ज आणि गौरीश जाधवने रचलेल्या अभेद्य भागीच्या जोरावर कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनने (केएसए) एमआयजी क्रिकेट क्लबचा ७ विकेटनी सहज पराभव केला आणि पद्माकर तालीम ढाल जिंकली.
वांद्र्याच्या एमआयजी क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या अंतिम लढतीत यजमान संघाला आपल्या घरच्या मैदानाचा लाभ उठवता आला नाही. केएसएने नाणेफके जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली आणि त्यांचा गोलंदाज राकेश प्रभूने तो निर्णय सार्थ ठरवला. त्याच्या अचूक गोलंदाजी पुढे एमआयजीचा संघ अक्षरशा कोलमडला. त्यांना पूर्ण २० षटकेही फलंदाजी करता आली नाही. १७ षटकांत एमआयजीचा अवघा संघ १२६ धावांत आटोपला. वरुण लवांदे (२८) आणि कौशल वळसणकर (३१) यांनी संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला.
केएसएला १२७ धावांचे लक्ष्य केवळ ३ फलंदाजांच्या मोबदल्यातच पार पाडले. शॉन रॉड्रिग्जने ३९ चेंडूंत नाबाद ५६ धावा टोलवताना संघाला १८ व्या षटकांतच विजय मिळवून दिला. त्याने गौरीश जाधवसह संघाच्या सहज विजयावर शिक्कामोर्तब केले. अंकित चव्हाणने केएसएचे २ विकेट लवकर मिळवत सामन्याच चुरस निर्मा करण्याचा प्रयत्न केला, पण शॉन आणि गौरीशने जोरदार खेळ केला आणि केएसएला विजेतेपद पटकावून दिले.
संक्षिप्त धावफलक : एमआयजी क्रिकेट क्लब : १७ षटकांत सर्वबाद १२६ ( वरुण लवांदे २८, कौशल वळसणकर ३१; राकेश प्रभू ३-०-२४-४. पराभुत विरुद्ध कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशन : १७.५ षटकांत ३ बाद १२७ ( शॉन रॉड्रिग्ज नाबाद ५६, गौरीश जाधव नाबाद ३९; अंकित चव्हाण ४-०-१९-२).

 273 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.