विक्रोळीत रंगणार कबड्डीचा रणसंग्राम

येत्या रविवारपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत पुरूष अ गटात १६, ब गटात २४, सब ज्युनियर किशोर गटात १६ आणि महिला विभागात ८ संघांचा सहभाग लाभला आहे.

मुंबई : उद्या बुधवारपासून विक्रोळी पार्क साईट, जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात प्रथमच कबड्डीचा रणसंग्राम रंगणार आहे. भाजपा, घाटकोपर (पश्चिम) विधानसभातर्फे जिल्हास्तरीय खासदार-आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या रविवारपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत पुरूष अ गटात १६, ब गटात २४, सब ज्युनियर किशोर गटात १६ आणि महिला विभागात ८ संघांचा सहभाग लाभला आहे. भाजपा घाटकोपर (प.) विधानसभा अध्यक्ष अनिल (भाई) निर्मळे हे या स्पर्धेचे आयोजक आहेत. स्पर्धेला लालबत्ती क्रीडा मंडळाचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेत मोठ्या रोख रकमेची पारितोषिके ठेवण्यात आली असून सर्वोत्तम खेळाडूंसाठी विशेष बक्षिसे देण्यात येतील. मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता खासदार मनोज कोटक, आमदार राम कदम यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल.

 129 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.