योगेश धोंगडेची व्हाईट आणि ब्लॅक स्लॅमसहीत आगेकूच

योगेशने पहिल्या सेटमध्ये चौथ्या बोर्डात व्हाईट स्लॅम व दुसऱ्या सेटमध्ये दुसऱ्या बोर्डात ब्लॅक स्लॅमची नोंद केली होती.

मुंबई : रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित शिवाजी महाराज स्मारक समिती जुहूच्या सहकार्याने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या उपउपांत्य फेरीत मुंबईच्या माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश धोंगडेने राष्ट्रीय कॅरमपटू ठाण्याच्या झैद अहमदवर २५-१३, ९-११, २५-३ अशी तीन सेटमध्ये अटीतटीच्या लढतीत मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात योगेशने पहिल्या सेटमध्ये चौथ्या बोर्डात व्हाईट स्लॅम व दुसऱ्या सेटमध्ये दुसऱ्या बोर्डात ब्लॅक स्लॅमची नोंद केली होती. तर झैदनेही पहिल्या सेटमध्ये तिसऱ्या बोर्डात व्हाईट स्लॅमची नोंद केली होती.
पुरुष एकेरी इतर निकाल पुढील प्रमाणे
प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि गिरीश तांबे ( मुंबई ) २२-९, ६-२५, २३-७, संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) वि वि पंकज पवार ( मुंबई ) २१-१७, १९-१३, संदीप देवरुखकर ( मुंबई ) वि वि महम्मद घुफ्रान ( मुंबई ) १६-२५, २१-१२, २२-२०
महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे
निलम घोडके ( मुंबई ) वि वि प्रीती खेडेकर ( मुंबई ) १५-२५, २२-१२, २४-२०, काजल कुमारी ( मुंबई ) वि वि श्रुती सोनावणे ( पालघर ) १७-९, १३-२०, २५-०, आयेशा साजिद खान ( मुंबई ) वि वि अंजली सिरीपुरम ( मुंबई ) २५-१५, २४-२, आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) वि वि अंबिका हरिथ ( मुंबई ) २०–७, १९-१५

 128 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.