ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्सचा मोठा विजय

ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स क्लबने फायझर स्पोर्ट्सचा सात विकेट्सनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आपल्या खात्यात आणखी एका विजयाची भर टाकली.

मुंबई : कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी -२० लीग क्रिकेट स्पर्धेत फायझर स्पोर्ट्स क्लबची पराभवाची मालिका कायम राहिली आहे. आज खेळल्या गेलेल्या सामन्यात ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स क्लबने फायझर स्पोर्ट्सचा सात विकेट्सनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आपल्या खात्यात आणखी एका विजयाची भर टाकली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या फायझर स्पोर्ट्सच्या फलंदाजांनी ओम्नी ग्लोबलच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली. त्यांच्या सचिन गोखले (१६) आणि कर्णधार आशिष केणीच्या १८ धावांच्या खेळीमुळे फायझर स्पोर्टसला ११.१ षटकात ५८ धावापर्यंत मजल मारता आली. मनोज सहानी आणि जेमीन पांचाळने प्रत्येकी चार विकेट्स मिळवत प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात मोलाचे योगदान दिले. प्रणित शेलारने एक विकेट मिळवली.
या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्सला आघाडीच्या फळीतील सूरज नायर आणि ऋषी भोसलेने विजयाचा दरवाजा उघडून दिला. सूरजने ३१ तर ऋषीने १५ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : फायझर स्पोर्ट्स : ११.१ षटकात सर्वबाद ५८ (सचिन गोखले १६, आशिष केणी १८, मनोज सहानी ४-२२-४, जेमीन पांचाळ २-५-४, प्रणित शेलार ३-११-१) पराभुत विरुद्ध ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स : ८.३ षटकात ३ बाद ६० ( सूरज नायर ३१, ऋषी भोसले १५, जगन रामास्वामी २-८-१, प्रित १-१८-१, प्रजीत नायर ०.३ – ५-१).

 226 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.