वृषाली, क्षमा, धनश्री चमकले

राजावडी क्रिकेट क्लबने केपीआर क्रिकेट क्लबचा १७० धावांनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या पहिल्या महिला टी -२० क्रिकेट लीग स्पर्धेतील आपली विजयी घौडदौड कायम राखली.

ठाणे : वृषाली भगत, क्षमा पाटकर, धनश्री वाघमारे यांच्या सातत्यपूर्ण फलंदाजीच्या जोरावर राजावडी क्रिकेट क्लबने केपीआर क्रिकेट क्लबचा १७० धावांनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या पहिल्या महिला टी -२० क्रिकेट लीग स्पर्धेतील आपली विजयी घौडदौड कायम राखली.
केपीआर क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकूनही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. वृषाली भगतची १०३ धावांची शतकी खेळी, क्षमा पाटकरच्या ५९, धनश्री वाघमारेच्या ४२ आणि मानसी बोडकेच्या नाबाद ३९ धावांच्या खेळीच्या जोरावर राजावडी क्रिकेट क्लबने प्रतिस्पर्ध्यांसमोर २६७ धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान पेलवताना केपीआर क्रिकेट क्लबला २० षटकात ७ बाद ९७ धावा करता आल्या. तन्वी परबने दोन फलंदाज बाद केले.

 73,120 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.