कोळी कंबाईंडने दुसऱ्यांदा जिंकली कॉस्मोपॉलीटिन शिल्ड

अवर्स क्रिकेट क्लबने ४५ षटकात ९ बाद २६३ धावांचे दिलेले आव्हान कोळी कंबाईंड संघाने ६ बाद २६९ धावा करत पार केले.

मुंबई : कोळी कंबाईंड संघाने अवर्स क्रिकेट क्लबचा सहा विकेट्सनी पराभव करत दुसऱ्यांदा कॉस्मोपॉलीटिन शिल्डवर आपले नाव कोरले. याआधी २०१८ साली कोळी कंबाईंड संघाने फोर्ट विजय क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा जिंकली होती. अवर्स क्रिकेट क्लबने ४५ षटकात ९ बाद २६३ धावांचे दिलेले आव्हान कोळी कंबाईंड संघाने ६ बाद २६९ धावा करत पार केले.
नॅशनल क्रिकेट क्लबच्या खेळपट्टीवर खेळवण्यात आलेल्या अंतिम लढतीत आदित्य वारंगच्या नाबाद १०९ धावांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अवर्स क्रिकेट क्लबने अडीच शतकी धावसंख्या उभारली होती. श्रेयस गुरवने ३६, अतिष वाळींजकरने २३ धावांचे योगदान दिले. रत्नेश चौधरी आणि हरदेव तांडेलने प्रत्येकी तीन विकेट्स मिळवल्या. देविदास कोळीने दोन विकेट्स मिळवल्या.
या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना आदित्य ह. कोळी, आदित्य म कोळी आणि चिन्मय पाटीलच्या अर्धशतकी खेळींमुळे कोळी कंबाईंड संघाने विजयाचे लक्ष्य सहज गाठले. आदित्य ह कोळीने ७९, आदित्य म कोळीने ५४, चिन्मय पाटीलने नाबाद ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. अतिष वळींजकरने तीन, श्रेयस गुरव आणि अमन तिवारीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक : अवर्स क्रिकेट क्लब : ४५ षटकात ९ बाद २६३ ( आदित्य वारंग नाबाद १०९, श्रेयस गुरव ३६, अतिष वळींजकर २३, रत्नेश चौधरी ७-४९-३, हरदेव तांडेल ९-४०-३, देविदास कोळी ९-१-३४-२, श्रेयस तांडेल ९-६८-१) पराभुत विरुद्ध कोळी कंबाईंड : ४२.३ षटकात ६ बाद २६९ ( आदित्य ह कोळी ७९, आदित्य म कोळी ५४, चिन्मय पाटील नाबाद ५१, अतिष वळींजकर ९-४३-३, श्रेयस गुरव ८-४०-१, अमन तिवारी ७-६२-१).

 199 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.