स्पर्धेतील स्पर्धकांना बटाट्यापासून बनवलेले पदार्थ सादर करायचे आहेत.
ठाणे : आगामी आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज सामाजिक सेवा संस्थेच्या महिला मंडळातर्फे शुक्रवार १० मार्च रोजी ठाणे महापालिका क्षेत्रमर्यदित खुल्या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील स्पर्धकांना बटाट्यापासून बनवलेले पदार्थ सादर करायचे आहेत. अष्टविनायक चौकातील मैदानात सायंकाळी ६.०० वाजता होणाऱ्या स्पर्धेच्या प्रवेशिका ८ मार्चपर्यंत स्विकारल्या जातील. अधिक माहितीसाठी स्वराज सामाजिक सेवा संस्थेच्या महिला अध्यक्षा सविता मनोहर चव्हाण यांच्याशी ८३५५८२५२७२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
24,418 total views, 2 views today