ठाण्यात रंगणार नवी मुंबई प्रीमियर लीग

विजेत्यांना मिळणार १५ लाख रुपयांचा रोख पुरस्कार, आठ संघ विजेतेपदासाठी देणार झुंज.

ठाणे : माझगाव क्रिकेट क्लब आयोजित नवी मुंबई प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला उद्या, २८ फेब्रुवारीपासून ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात सुरुवात होईल.
प्रामुख्याने स्थानिक खेळाडूंचा सहभाग असलेल्या या लीगमध्ये आठ संघ विजेतेपदाच्या १५ लाख रुपयांच्या रोख बक्षीसासाठी लढत देतील. त्यात अंबरनाथ ऍव्हेंजर्स, वाशी वारियर्स, कोपरखैरणे टायटन्स, मिरा भाईंदर लायन्स, बेलापूर ब्लास्टर्स, ठाणे टायगर्स, सानपाडा स्कॉर्पिअन, कल्याण टस्कर आदी संघाचा समावेश आहे. स्पर्धेदरम्यान प्रत्येक संघ सात सामने खेळेल. त्यातील गुणानुक्रमे पहिले चार संघ उपांत्य फेरीत खेळण्यासाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने १४ मार्च रोजी तर अंतिम सामना १५ मार्चला खेळवण्यात येईल. राष्ट्रीय पातळीवर खेळलेले चिन्मय सुतार, वरुण लवांडे, तनुष कोटीयन, हार्दिक तामोरे, आकाश पारकर, बद्री आलम, दिव्यांश सक्सेना, सागर जाधव, धृमिल मटकर, प्रसाद पवार आदी खेळाडू या लीगमध्ये खेळणार आहेत. विजेत्यासंघासह उपविजेत्या संघाला १० लाख, तिसऱ्या क्रमांकांच्या संघांना प्रत्येकी पाच लाख, पाचव्या क्रमांकाच्या संघाला चार लाख,सहाव्या क्रमांकाच्या संघाला तीन लाख, सातव्या क्रमांकाच्या संघाला दोन लाख आणि तळाच्या संघाला एक लाख रुपये मिळतील. याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत.

 15,283 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.