अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकरांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पोलीस पदक

नोव्हेंबर २०१८ साली परभणी जिल्ह्यातील बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाच वर्षे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करण्यात आलेला होता त्यावेळी तत्कालीन तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी  अनिल घेरडीकर यांनी शास्त्रोक्त पद्धतीने तपास केल्यामुळे आरोपीला नैसर्गिक मृत्युपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

ठाणे : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर याना केंद्रीय  गृहमंत्री यांचे  सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक पोलीस महासंचालक महाराष्ट्र रजनीश शेठ यांचा हस्ते देण्यात आले.
सांगोला तालुक्यातील घेरडीचे रहिवासी व  ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांना तपासात गुन्हाचे सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषण केल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट तपास विशेष पोलिस पदक देऊन पुणे येथील पोलिस रिसर्च सेंटर येथे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.नोव्हेंबर २०१८ साली परभणी जिल्ह्यातील बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाच वर्षे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करण्यात आलेला होता त्यावेळी तत्कालीन तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी व सध्या ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अधिकारी अनिल घेरडीकर यांनी शास्त्रोक्त पद्धतीने तपास केल्यामुळे आरोपीला नैसर्गिक मृत्युपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाचे उत्कृष्ट तपास विशेष पोलिस पदक देऊन ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर याना सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना पदक मिळाल्याबद्दल संजय मासाळ व त्यांचा ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांचे गावातील नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

 43,348 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.