बुधवारी काँग्रेसचा गडकरी रंगायतन येथे जल्लोश
ठाणे : हाथ से हाथ जोडो अभियानांतर्गत लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्यात येउन आगामी काळात काँग्रेस स्वतःला सिद्ध करणार असल्याचे प्रतिपादन शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.
ठाणे काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने बुधवार १५ फेब्रुवारी रोजी गडकरी रंगायतन येथे सायकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत “जल्लोश” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याची माहीती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत विक्रांत चव्हाण याच्यासह मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, काँग्रेस उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक काँग्रेस प्रवक्ते राहूल पिंगळे,अॅड बाबासाहेब भुजबळ,प्रदेश सदस्य रमेश इंदिसे,सरचिटणीस महेंद्र म्हात्रे,रेखा मिरजकर आदी पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाची माहीती देताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,ठाण्यातील काँग्रेस पक्ष आगामी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणार असून हाथ से हाथ जोडो अभियान राबवित असताना तळागाळातील जनतेपर्यंत काँग्रेस कार्यकर्ता जाणार आहे तसेच शैक्षणिक क्षेत्र,क्रीडा क्षेत्रातही काँग्रेस अग्रेसर राहणार असून येत्या १५ तारखेच्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विविध क्षेत्रात प्रामुख्याने वैद्यकीय,सामाजिक,शासकीय पत्रकारिता स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे,त्याच बरोबर राज्यात प्रथमच आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांकडून त्या त्या पक्षांच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला गेला नसेल परंतु ठाण्यातील काँग्रेस आपल्या पक्षासाठी काम केलेल्या व दिवंगत कार्यकर्त्याच्या कुटूबियांना सन्मानित करणार आहेत याच कार्यक्रमात शहर काॅग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धा व दीपावली काळात आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार असून याच कार्यक्रमाद्वारे अ.भा.काँग्रेस कमिटीकडून राबविण्यात येत असलेल्या “हाथ से हाथ जोडो” अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार असून याकरिता काँग्रेस सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्नील कोळी व पर्यावरण विभाग अध्यक्ष मनोज डाकवे याच्या सह सर्व पदाधिकारी परिश्रम घेत असल्याचेही विक्रांत चव्हाण यानी शेवटी बोलताना सांगितले.
10,444 total views, 1 views today