संदीप ओंबासे यांची आशियाई तायक्वांदोच्या वित्त समिती सदस्यपदी नियुक्ती

     
आशियाई तायक्वांदो युनियनच्या विकासासाठी विविध उपक्रम अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या तायक्वांदो खेळाच्या सुविधा आणि व्यवस्था याचे आर्थिक नियोजन आणि आयोजन सू व्यवस्थित होण्यासाठी आणि ओंबासे यांनी तायक्वांदो या खेळासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची निवड केल्याचे आशियाई तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष प्रो. क्यू सीओक ली यांनी सांगितले.
                                                                            
  ठाणे : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप यशवंतराव ओंबासे यांची आशियाई  तायक्वांदो युनियन  संघटनेच्या वित्त (फायनान्स) आयोग समिती सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नाशिक येथील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेच्या दरम्यान इंडिया तायक्वांदो अध्यक्ष आणि महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन चे महासचिव नामदेव शिरगावकर आणि इंडिया – कोरिया जागतिक   तायक्वांदोचे समन्वयक किराश बेहेरा यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
आशियाई तायक्वांदो युनियनच्या विकासासाठी विविध उपक्रम अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या तायक्वांदो खेळाच्या सुविधा आणि व्यवस्था याचे आर्थिक नियोजन आणि आयोजन सू व्यवस्थित होण्यासाठी आणि ओंबासे यांनी तायक्वांदो या खेळासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची निवड केल्याचे आशियाई तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष प्रो. क्यू सीओक ली यांनी सांगितले. आपली रेल्वेमधील अधिकारी पदाची नोकरी सांभाळत त्यांनी तायक्वांदो या खेळामध्येही चमक दाखवली आहे. तायक्वांदो या खेळामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून आपल्या खेळामधील विविध पैलुंचे प्रदर्शन करत सुवर्ण कामगिरी केली आहे.  १९९४ ला जर्मनी (वेसेल) येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले तर भारतीय ऑलिम्पिक संघटने तर्फे मणीपूर (इम्फाळ) येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले, तसेच आतापर्यंत २२  राज्यस्तरीय , ८ राष्ट्रीय, व २ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा मान त्यांना मिळाला.
सध्या ते तायक्वांदो असोसिएशनचे ऑफ महाराष्ट्र महासचिव आणि तायक्वांदो  ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत हजारो खेळाडू तयार झाले आहेत. या खेळाची जागतिक संघटना वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन या संघटनेच्या जागतिक कॉन्फरन्स साठी  २०१६ ला रशिया येथे भारतातुन संदीप ओंबासे यांना उपस्थित राहण्याचा मान मिळाला होता. या खेळासाठी त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.               
सेंट्रल रेल्वेच्या वतीने रेल्वेगाडीमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार व हल्ला रोखण्यासाठी संदिप ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल रेल्वेने ५० महिला कमांडोचे पथक तयार करून सेंट्रल रेल्वेमध्ये तैनात केले होते. त्या सर्व महिला कमांडोंना तायक्वांडो प्रशिक्षण व प्राथमिक स्वरूपाचा हल्ला रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची बहुमोल कामगिरी ओंबासे यांनी केली होती. या कामगिरीबद्दल सेंट्रल रेल्वे च्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यापासून झालेली सुरुवात राज्य, देश आणि आता जागतिक पातळीवर काम करायची मिळालेली संधी याचा नक्कीच फायदा घेऊन खेळा विकास कसा होईल  असे काम करेल असा विश्वास संदीप ओंबासे यांनी बोलून दाखवला.

 575 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.