शिवाजी पार्क जिमखान्याच्या १४ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला प्रारंभ
मुंबई : शिवाजी पार्क जिमखान्याच्यावतीने सारस्वत बँक पुरस्कृत १४ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला काल सुरुवात झाली. स्पर्धेचे उदघाट्न शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र उतेकर ( गुन्हे विभाग ) यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केल्यानंतर कॅरम बोर्डवरील फित कापून व खेळून करण्यात आले. याप्रसंगी शिवाजी पार्क जिमखान्याच्या सचिव संजीव खानोलकर, कार्याध्यक्ष दिपक मुरकर, ट्रस्टी प्रकाश नायक व महेंद्र ठाकूर, खजिनदार विलास सोमण, सहसचिव सुनील रामचंद्रन, सदस्य आशुतोष जोगळेकर, राज्य कॅरम संघटनेचे सचिव यतिन ठाकूर, मुंबई जिल्हा कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर पुरुष एकेरी गटांच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात झाली. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत माजी विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेने मुंबईच्या शुभम सूर्यवंशीचा २५-४, २५-९ असा सहज पराभव केला. तर विद्यमान विश्व् विजेत्या मुंबईच्या संदीप दिवेने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबईच्या कुणाल राऊतला २५-४, ९-२५ व २५-७ असे पराभूत करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरी दुसऱ्या फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे
संदीप देवरुखकर ( मुंबई ) वि वि अशोक सावंत ( मुंबई ) २५-१, २५-०, अनंत गायत्री ( मुंबई ) वि वि क्षितिज हडावले ( ठाणे ) २५-१२, २६-६, ओमकार नेटके ( मुंबई ) वि वि नंदू सोनावणे ( पुणे ) २५-५, १६-२५, २५-४
विश्वनाथ देवरूखकर ( मुंबई ) वि वि गौरव हुदळे ( कोल्हापूर ) २५-६, २३-४, हिदायत अन्सारी ( मुंबई ) वि वि संतोष वसावे ( मुंबई ) २५-१८, २५-५
रमेश देवकुळे ( ठाणे ) वि वि विक्रांत धीवर ( मुंबई ) १८-१९, २५-१९, २४-१०, ओमकार टिळक ( मुंबई ) वि वि जितेश कदम ( मुंबई ) १७-१५, ४-२५, २५-३
367 total views, 3 views today