वायू  प्रदूषणामुळे शरीरात इन्सुलिन बनण्याची प्रक्रिया मंदावली

वाढत्या वायू प्रदूषणामुळे मुंबई आणि जवळपासच्या शहरांमधील मधुमेही रुग्ण संकटात                                                                                         
मुंबई -ठाणे :  सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्ट अँड रिसर्च म्हणजेच सफर या संस्थेच्या  आकडेवारीनुसार, १ नोव्हेंबर २०२२  ते ३१ जानेवारी २०२३  दरम्यानच्या ९२ दिवसांपैकी मुंबईने ६६ दिवसांमध्ये ‘खराब’ आणि ‘अतिशय खराब हवेचा निर्देशांक ‘  नोंदवला आहे.  एकूण ९२ दिवसांपैकी मुंबईने केवळ एक दिवसच  ‘चांगली’ आणि ‘समाधानकारक’ हवेचा निर्देशांक नोंदवला गेला. वायू प्रदूषण हे इन्सुलिन प्रतिरोधक आणि टाइप २ मधुमेह मेल्तिसच्या घटनांचे प्रमुख कारण आहे.  वैद्यकीय क्षेत्रामध्ये वायू प्रदूषण आणि मधुमेह यांच्यातील संबंध वाढत्या वाहतूक रहदारी संबंधित प्रदूषक म्हणजेच धुरातून निघणारे  विषारी वायू, नायट्रोजन डायऑक्साइड, तंबाखूचा धूर (धूम्रपान ) आणि इतर दूषित घटक यांच्याशी थेट संबंधित आहे. या घटकांचा प्रभाव मानवी आरोग्यावर लगेचच  दिसून येतो, हेच दुषित घटक वातावरणात कित्येक वर्षे, दशके, किंबहुना शतके टिकून राहतात व हेच घटक मुख्यत्वे सध्याच्या वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. याविषयीची अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे  मधुमेहतज्ञ डॉ. तरुण जैन म्हणाले,” वायुप्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम श्वसनसंस्थेवर होतात. वर नमूद केल्याप्रमाणे विविध प्रदूषक घटके श्वसनव्यस्थेवर हल्ला चढवतात. ओझोन, नायट्रोजन डायॉक्साईड.हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. ओझोन फुफ्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुफ्फुसे कमजोर करतो, त्यामुळे दमा वाढीस लागतो. नायट्रोजन ऑक्साईड हे श्वसन नलिकेत व फुफ्फुसांत गेल्यानंतर फुफ्फुसे व श्वसन नलिका ते विरघळवण्यासाठी जास्तीजास्त कफाची निर्मिती करतात व त्यामुळे आपणास सर्दी होते. सध्याचे महामारी शास्त्रीय पुरावे असे सूचित करतात की, हवेतील प्रदूषकांची उच्च सांद्रता आणि वायू प्रदूषकांच्या दीर्घ संपर्कामुळे टाइप २ मधुमेहाशी संबंधित बायोमार्कर्स वाढतात. वायू प्रदूषणामुळे शरीरातील  नैसर्गिक कार्यप्रणाली बिघडण्यास सुरुवात होते त्यामुळे शरीरातली इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.  पीएम २.५ कण अंतःस्रावी व्यत्यय आणणारे असतात. ते इंसुलिन स्रावावर परिणाम करू शकतात.  हिवाळ्याच्या काळात वाऱ्याचा वेग मंदावतो त्यामुळे  प्रदूषित धूलिकण जास्त काळ हवेत थांबतात याचा हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, यासोबतच मुंबई, ठाणे नवी मुंबई येथे वेगाने होणारी मेट्रो तसेच इमारती उभारण्याची  बांधकाम कामे, उघड्यावर कचरा जाळणे आणि अमर्याद वाहनांचे उत्सर्जन यांसारखे घटकही मुंबईतील हवेचा दर्जा बिघडवण्यात कारणीभूत ठरत आहेत. डायबेटिसचा वायू प्रदूषणाशी संबंध ठरवण्यासाठी जो अभ्यास करण्यात आले त्यापैकी बहुतांश कार, ट्रक आणि डिझेल एक्झॉस्टमधून होणाऱ्या प्रदूषक उत्सर्जनामुळे होत असल्याचा दाखला दिला गेला आहे. जगात मधुमेह असलेल्या व्यक्तींची संख्या भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि २०४५ पर्यंत ही संख्या १२० दशलक्षांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.”देशातील वायू प्रदुषणामुळे ८ महत्वाच्या शहरांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतातील मुंबई, बेंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, सुरत, पुणे आणि अहमदाबाद या आठ शहरांमध्ये २००५ ते २०१८ या कालावधीत एक लाखाहून अधिक लोकांचा अकाली मृत्यू झाला, अशी माहिती वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने दिली आहे. आफ्रिका, आशिया आणि पश्चिम आशियातील ४६ शहरांच्या हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करून ही माहिती देण्यात आली आहे. ज्यामुळे हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत असल्याचे दिसून येत असून वायू प्रदूषणाच्या संपर्कात येणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याकडे संशोधकांनी लक्ष वेधले आहे अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाचे  मधुमेहतज्ञ डॉ. तरुण जैन यांनी दिली

 15,122 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.