शारदाश्रम तांत्रिक विद्यालयात क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
मुंबई : दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा पारितोषिक समारंभ गुरुवारी शाळेत संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेतील विविध स्पर्धांमधील विजेत्यांना गौरवण्यात आले. एनआयएस प्रशिक्षक जीवन पैलकर, माजी राष्ट्रीय कबड्डीपटू अनिल नागवेकर, माजी राष्ट्रीय कबड्डीपटू वैशाली सावंत, माजी कबड्डीपटू आणि फिजिओ शैलेश शेलार, फुटबॉल प्रशिक्षक शृंगार राऊळ, फुटबॉल प्रशिक्षक परवेझ शेख, तांत्रिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मेधा पाटील, समन्वयक शिक्षिका हर्षदा मिश्रा, आदी मान्यवर उपस्थित होते. ओम कबड्डी प्रबोधिनीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल आणि कबड्डी शिबिरांचे नुकतेच आयोजन केले होते. या शिबिरार्थींना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. या शिबिरातील कबड्डी क्रीडा प्रकारात तन्मय सुर्वे, जान्हवी जाधव सर्वोत्तम शिबिरार्थी ठरले. तसेच फुटबॉल क्रीडा प्रकारात वीर जाधव, आर्या गंगावणे आणि मानसी विश्वकर्मा सर्वोत्तम शिबिरार्थी ठरले.
292 total views, 1 views today