प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने गरजूंना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत हेल्मेट वाटप

दुचाकी स्वराला शिस्त बसावी यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने मोफत हेल्मेट वाटपाचे आयोजन केले होते.

ठाणे : दुचाकीवर अपघात घडल्यावर डोक्यावर हेल्मेट किती महत्वाचे आहे हे सांगायला नको. मात्र तरी देखील अनेकजण हेल्मेट घालून दुचाकी चालवायचे टाळतात. अशा दुचाकीस्वाराला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि भारतीय स्टेट बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गरजू दुचाकीस्वाराला मोफत हेल्मेट चे वाटप ठाण्यात करण्यात आले.
ठाण्यात दिवसागणिक वाहनाची संख्या वाढत असताना दुसरीकडे बेपर्वा वाहन चालविणाऱ्या चालकांमुळे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. रस्ते अपघातात दुचाकी अपघाताची संख्या अधिक असल्याचे बोलले जाते आणि यात सर्वाधिक मृत्यू देखील दुचाकीस्वाराचेहोत असतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन अथवा डोक्यावर हेल्मेट नसणे अशी काही कारणे मृत्यूस कारणभूत ठरतात. दुचाकी चालवताना प्रत्येकाने हेल्मेट घालणे बंधनकारक असेल तरी अनेकजण याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. काही वेळा हेल्मेट नसल्यामुळे वाहतूक दंड देखील भरावा लागतो. दुचाकी स्वराला शिस्त बसावी यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने मोफत हेल्मेट वाटपाचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोफत हेल्मेट वाटपाचा शुभारंभ ठाण्यात मुलुंड चेक नाका दत्त मंदिर येथे करण्यात आला असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडियाने सामाजिक बांधिलकी दाखवत हेल्मेट वाटप कार्यक्रमात मोठे योगदान दिले आहे तर ठाणे जिल्हा ट्रक टेम्पो बस टँकर वाहतूक सेवा संघ, श्री वागळे इस्टेट लॉरी ओनर्स असोसिएशन आदींच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबवण्यात आला.

 26,709 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.