एमडीसीसी विजयाच्या मार्गावर

फलंदाजीत छाप पाडणाऱ्या वासीम अश्रफने २४ धावांत ३ विकेट्स मिळवत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.
मुंबई : पहिल्या सामन्यात पराभुत झालेल्या माहीम दर्गा क्रिकेट क्लबने अरुप्रित टायगर्सचा सात धावांनी पराभव करत मुंबई चॅम्पियनशिप टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत विजयाचे खाते खोलले. कोकण युवा प्रतिष्ठानने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या माहीम दर्गा क्रिकेट क्लबला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अर्शद अब्दुल (२६), वासीम अश्रफ (१८) आणि इम्रान माथेरानवालाच्या १३ धावांमुळे माहीम दर्गा क्रिकेट क्लबला १५.२ षटकात १०५ धवापर्यंत मजल मारता आली. निरांकर शर्माने ३१ धावांत ३, सिम्मतने ९ धावांत २, अजय सिंघमने २९ धावांत २, यश मल्होत्रा आणि पियुष कनोजीयने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना अरुप्रीत टायगर्सचा डाव १४ व्या षटकात ९८ धावांवर आटोपला. फलंदाजीत छाप पाडणाऱ्या वासीम अश्रफने २४ धावांत ३ विकेट्स मिळवत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. अजय सिंघमने (२६), निरांकर शर्मा (१५), वैभव मुजागे आणि विशाल पुढारीने प्रत्येकी १४ धावा केल्या. वासीमला गोलंदाजीत साथ देताना नबीउल शेख, अभिषेक दुबे आणि समीर खंडवानीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. वासीमला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक –
माहीम दर्गा क्रिकेट क्लब : १५.२ षटकात सर्वबाद १०५ ( अर्शद अब्दुल २६, वासीम अश्रफ १८, इम्रान माथेरानवाला १३, निरांकर शर्मा ४- ३१-३,अजय सिंघम ३-२९-२, सिम्मत २.२-१-९-२, यश मल्होत्रा ३-१४-१, पियुष कनोजिया २-१-१२-१) विजयी विरुद्ध अरुप्रित टायगर्स : १४ षटकात सर्वबाद ९८ ( अजय सिंघम २६, निरांकर शर्मा १५, वैभव मुजागे १४, विशाल पुढारी १४, वासीम अश्रफ २-२४-३, नबीउल शेख ४-२३-२, अभिषेक दुबे ४-१७-२, समीर खंडवानी २-२०-२) माहीम दर्गा क्रिकेट क्लब ७ धावांनी विजयी, सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – वासीम अश्रफ.

 472 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.