ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या विजयानंतर
ठाण्यात भाजपाचा जल्लोष

निरंजन डावखरे, संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा जयजयकार

ठाणे : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांच्या विजयानंतर ठाणे शहर भाजपाच्या वतीने खोपट कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपाईं युतीच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या पहिल्या फेरीपासून भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आघाडी घेतली. विजयाच्या कोटा पार करून २० हजार मतांवर झेप घेतल्यानंतर, कोकणाच्या विविध भागांबरोबरच ठाण्यातही भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयाबाहेर ढोल-ताशांच्या गजरात आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षक हिताच्या दृष्टीकोनातून केलेल्या चांगल्या कामांना कोकणातील शिक्षकांनी पसंती दिली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आखलेल्या व्यूहनीती नुसार युतीच्या कार्यकर्त्यांनी कार्य केले. त्यामुळे भाजपाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली. तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाने महाविकास आघाडीला चपराक बसली आहे. एकसंध असलेल्या आघाडीला कोकणातील शिक्षकांनी जागा दाखवून दिली, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली.
या विजयोत्सवात भाजपाचे प्रदेश सचिव संदीप लेले, भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण, कृष्णा पाटील, स्नेहा आंब्रे, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, भाजपा शहर सरचिटणीस कैलास म्हात्रे, मनोहर सुखदरे, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, कृष्णा भुजबळ, विक्रम भोईर, श्रुतिका मोरेकर, ज्योती पाटील आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 11,265 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.