मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या
अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे

महेश पवार उपाध्यक्ष, कार्यवाहपदी प्रवीण पुरो तर कोषाध्यक्षपदी विनोद यादव यांची झाली निवड.

मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सोमवारी ३० जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीत दै. ‘मुंबई लक्षदीप’चे पत्रकार प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदासाठी ‘टीव्ही ९’चे पत्रकार महेश पवार (५८ मते), कार्यवाहपदी ‘टुडे रायगड’चे पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्षपदी दैनिक ‘भास्कर’चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते) यांची निवड करण्यात आली.
कार्यकारीणीवर दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस’ चे पत्रकार अलोक देशपांडे (७१मते), दैनिक ‘लोकमत’ चे पत्रकार मनोज मोघे (६८मते), ज्येष्ठ पत्रकार कमलाकर वाणी (६१ मते), दै. ‘नवाकाळ’ चे पत्रकार खंडूराज गायकवाड (५९ मते), दै. ‘डेक्कन क्रॉनिकल’चे भगवान परब (५८ मते) निवडून आले. प्रती दोन वर्षांनी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाची निवडणूक होते.

 257 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.