ओम् ज्ञानदीप क्रीडा मंडळ रौप्यमहोत्सवी वर्ष “पुरुष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२३”
मुंबई : मिडलाईन फौंडेशन-रायगड विरुद्ध बृहन्मुंबई महानगर पालिका-मुंबई शहर आणि मध्य रेल्वे-मुंबई शहर विरुद्ध प्रो-ऑलिमिया-पालघर या सामन्याने ओम् ज्ञानदीप मंडळाने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या पुरुष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला २८ जानेवारी रोजी सायं. ६-००वा. प्रारंभ होईल. वरळी-आदर्श नगर,मुंबई येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावरील ” प्रभाकर(दादा) अमृते क्रीडांगरीत” २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा खेळविण्यात येईल. दोन मॅटच्या क्रीडांगणावर होणाऱ्या या स्पर्धेत १५ नामवंत संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. सर्व सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील. कबड्डी रसिकांना सामान्यांचा आनंद मनमुराद घेता यावा म्हणून २,००० क्षमतेची प्रेक्षक गॅलरी देखील उभारण्यात आली आहे.
स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघास आकर्षक चषक व रोख एक लाख रुपये (₹१,००,०००/-), तर उपविजयी संघास आकर्षक चषक व रोख साठ हजार रुपये (₹६०,०००/-) प्रदान करण्यात येतील. उपांत्य पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख वीस हजार रुपये (₹२०,०००/-) देऊन सन्मानित करण्यात येईल. स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या खेळाडूस खास आकर्षक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या चढाई व पकडीच्या खेळाडूंना प्रत्येकी वॊशिंग-मशिन(धुलाई-यंत्र) देण्यात येईल. प्रतिदिनीचा मानकरी ठरणाऱ्या खेळाडूस “३२इंची एल.ई. डी. टी.व्ही. प्रदान करण्यात येईल. स्पर्धेची तयारी जोरदार सुरू आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाची पाच गटात विभागणी करण्यात आली असून ती आज एका परिपत्रकाद्वारे प्रसार माध्यमाकरिता जाहीर करण्यात आली.
व्यावसायिक पुरुष गट गटनिहाय विभागणी
१) अ गट :- १)युवा फलटण, २)ठाणे महानगर पालिका, ३)एच.ए.एल.-नाशिक.
२) ब गट :- १)युनियन बँक, २)रुपाली ज्वेलर्स, ३)मध्य रेल्वे-माटुंगा विभाग.
३) क गट :- १)महिंद्र, २)पिंपरी-चिंचवड चॅलेंजर्स-पुणे, ३)बँक ऑफ बडोदा.
४) ड गट :- १)मध्य रेल्वे, २)प्रो-ऑलिमिया-पालघर, ३)एअर इंडिया.
५) ई गट :- १)मिडलाईन फौंडेशन-रायगड, २)रिझर्व्ह बँक, ३)बृहन्मुंबई महानगर पालिका.
50 total views, 1 views today