…तोपर्यंत हिंदूंचा संघर्ष चालूच राहिल

लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधांतील कायदे तातडीने करा –  घाटकोपर येथील हिंदु जनसंघर्ष मोर्च्यात सहभागी हजारो हिंदूंची चेतावणी

  ठाणे : ‘लव्ह जिहाद’, लॅण्ड जिहाद’ व ‘धर्मांतर’ विरोधी कायदे महाराष्ट्रात तातडीने लागू करावेत या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने घाटकोपर येथे २२ जानेवारीला ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढण्यात आला. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील १ हजार ५०० धर्मप्रेमी हिंदूंनी या मोर्चात सहभाग होऊन हिंदूंच्या संघटित शक्तीचा अविष्कार दाखवला. घाटकोपर (प.) येथील सर्वोदय हॉस्पिटल चौक येथून निघालेला मोर्चा श्रेयस सिग्नल-साईनाथ नगर या मार्गाद्वारे मार्गक्रमण करत अमृत नगर सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे मोर्च्याची सांगता करण्यात आली. या मोर्च्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, हिंदु राष्ट्रसेना, बजरंग दल, योग वेदांत सेवा समिती, श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी), परशुराम तपोवन आश्रम (वसई), सनातन वैदिक संस्कृती केंद्र, भारत सोसायटी संघ (घाटकोपर), सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी  हिंदुत्वनिष्ठ  संघटनांच्या प्रतिनिधीसह भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचे कार्यकर्ते तसेच अधिवक्ते, उद्योजक आदी शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्च्यामध्ये महिला अन् युवतींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधांतील कायदे होईपर्यंत हिंदूंचा संघर्ष चालू राहिल, असा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
हिंदु मुलींना फसवून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्या निघृणपणे हत्या करणे या ‘लव्ह जिहाद’च्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. वसई येथील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर, मुंबईतील टिळकनगर येथील रुपाली चंदनशिवे, धारावी येथील यथोधरा खटिक, कोपरखैरणे येथील उर्वशी वैष्णव, मुंबईतील अभिनेत्री तनुषी शर्मा यांसह देशभरातील अनेक युवतींनी लव्ह जिहादच्या प्रकरणात आपला जीव गमावला आहे. देशातील ११ राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा तातडीने लागू करण्याची मागणी या मोर्च्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला, युवतींसह हिंदूकडून करण्यात आली. ‘लॅण्ड जिहाद’ च्या आघातामुळे देशात अनेक ठिकाणी हिंदूंना जबरदस्तीने स्थलांतर करण्यास भाग पाडले जात आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील विविध भागात हे प्रमाण वाढतच आहे. असल्फा व्हिलेज, घाटकोपर (प) मधील भारत सोसायटी रहिवाशी संघ येथे बांधलेल्या अनाधिकृत मदरशाचे बांधकाम मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करून तोडावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रात अनेक गड-किल्ल्यांवर अनाधिकृत बांधकामे करुन इस्लामी अतिक्रमणे झाली आहेत. ‘वक्फ बोर्ड’सुद्धा सरकारी व खाजगी जमीन हडप करत आहे, हा काळा कायदा रद्द करणे गरजेचे आहे. लॅण्ड जिहाद’ रोखण्यासाठी सरकार कठोर पावले कधी उचलणार ? अशा प्रश्न या मोर्च्यात उपस्थित करण्यात आला ‘लॅण्ड जिहाद’ सोबत देशात छळ, बळ, कपट करून चालेल्या धर्मांतरामुळे देशातील २८ पैकी ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. मुंबईतील घाटकोपरमधील असल्फा भागात, नवी मुंबई तसेच पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत आहे. भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर धर्मांतरबंदी व्हायलाच हवी. म्हणूनच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या मोर्च्यात सहभागी झालेल्या हिंदूंनी ‘हिंदु युवतींनो लव्ह जिहादला बळी पडू नका’,’लव्ह जिहाद करणाऱ्याना फाशी द्या !’, ‘हिंदूंनो लॅण्ड जिहाद विरोधात संघटित व्हा !’, ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’, आदी विषयांवर हातात फलक धरले होते. यावेळी ध्वनीक्षेपणाद्वारे प्रबोधन करत मोर्च्यात करण्यात आलेल्या विविध मागण्याविषयी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनासाठी स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आले.  या मोर्च्याच्या  सांगता समारोहात मान्यवर वक्त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.

 9,326 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.