सेंट ऍनीस शाळेला सांघिक विजेतेपद

प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात तिरंदाजी स्पर्धा

मुंबई : वांद्रयाच्या सेंट ऍनीस शाळेने प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात तिरंदाजी स्पर्धेत कमालच केली. एकंदर २७ स्पर्धापैकी १८ स्पर्धेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी सोनेरी यश संपादले आणि त्यांनी सर्वाधिक १४१ गुणांसह निर्विवादपणे तिरंदाजी स्पर्धेत सांघिक विजेतेपदावर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्य यशोधाम शाळेला ८ सुवर्णपदकांमुळे ६० गुण मिळाले. त्यांना सांघिक उपविजेतेपद मिळाले तर श्री श्री रविशंकर विद्यामंदिरला तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. या शाळेला केवळ एकच सुवर्ण मिळविता आले.
पश्चिम उपनगरातील २८ शाळांमधील १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यानी या स्पर्धेत आपल्या तिरंदाजीचे कौशल्य सादर करीत पदकांना गवसणी घातली.
प्रबोधन आंतरशालेय क्रीडा स्पर्धा
तिरंदाजी स्पर्धेचा निकाल
इंडियन राऊंड-15 मी. (12 वर्षाखालील मुले ) : 1. रियान पाटील (पारिख इंटर.), 2. रूद्र मालाडकर (श्री श्री रवीशंकर), 3. विहान शाह ( जानकीदेवी)
इंडियन राऊंड- 15 मी. (12 वर्षाखालील मुली ) : 1.आर्या टेमकर (श्री श्री रवीशंकर), 2. रिवा शिंदे (सेंट ऍनीस) 3. अतिफा मनियार (सेंट ऍनीस).
इंडियन राऊंड- 20 मी. (12 वर्षाखालील मुले ) : 1. रियान पाटील (पारिख इंटर.), 2. रूद्र मालाडकर (श्री श्री रवीशंकर), 3. विहान शाह ( जानकीदेवी)
इंडियन राऊंड- 20 मी. (12 वर्षाखालील मुली ) : 1. रिवा शिंदे (सेंट ऍनीस),2. आर्या टेमकर (श्री श्री रवीशंकर), 3. अतिफा मनियार (सेंट ऍनीस).
इंडियन राऊंड- 30 मी. (14 वर्षाखालील मुले ) : 1. ध्रूव पायरे (श्री श्री रवीशंकर), 2. रियांश ठाकूर ( स्वामी विवेकानंद), 3. तिमीज मौर्या (श्री श्री रवीशंकर)
इंडियन राऊंड- 30 मी. (17 वर्षाखालील मुली) : 1. श्रुती यादव (सेंट ऍनीस), 2. अलिनाह पटेल ( सेंट ऍनेस), 3. संस्कृती खंबाडकर (भवन्स)
रिकर्व्ह राऊंड- 30 मी. ( 12 वर्षाखालील मुले : 1. शौर्य प्रभू (वीर भगतसिंग), 2. दिव्यांशी राऊत (हिरानंदानी फाऊं.)
रिकर्व्ह राऊंड- 50 मी. (14 वर्षाखालील मुले) : 1. रिआन भगत (वीर भगतसिंग), 2. अर्जुन कुलकर्णी (श्री श्री रवीशंकर).
कपाऊंड राऊड – 30 मी. (12 वर्षाखालील मुले ) : 1. अवनीश गोगावले ( सेंट ऍनेस), 2. धनुश नायर (यशोधाम).
कपाऊंड राऊड – 30 मी. (12 वर्षाखालील मुली ) : 1. स्वरा शिंदे (सेंट ऍनीस), 2. फातिमा नावशेकर (सेंट ऍनीस).
कपाऊंड राऊड – 50 मी. (14 वर्षाखालील मुले) : 1. पारस डोंगरे (सेंट ऍनीस), 2. कविषा पटेल (सेंट ऍनीस).
कपाऊंड राऊड – 50 मी. (17 वर्षाखालील मुले) : 1. हर्ष जाधव (सेंट ऍनीस), 2. कृष्णा सूर्यवंशी ( पार्ले टिळक).
कपाऊंड राऊड – 40 मी. (14 वर्षाखालील मुली) : 1. प्रगती झा (गोकुळधाम), 2. साई मालंडकर (श्री श्री रविशंकर), 3. अधविका नायर (सेंट ऍनीस).

 214 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.