स्वराली, सिद्धेशला विजेतेपद

आठवीपर्यंतच्या मुलांमध्ये साईना आणि दक्ष अव्वल – प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव

मुंबई : सिद्धेश देसाईने अखेरचा डाव बरोबरीत सोडविल्यानंतरही त्याने सर्वाधिक ४.५ गुण मिळवित प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाच्या बुद्धिबळ प्रकारात दहावीपर्यंतच्या मुलांच्या गटात बाजी मारली. मुलींच्या याच गटात स्वराली कोठे अव्वल आली. ८ वी पर्यंतच्या मुलांच्या गटात दक्ष जैन पहिला आला तर साईना नागरकट्टेने मुलींच्या गटात अव्वल स्थान पटकावला.
प्रबोधन गोरेगावच्या क्रीडाभवनात सुरु असलेल्या आंतरशालेय् बुद्धिबळ स्पर्धेत ४५ पेक्षा अधिक शाळांमधील मुलांनी आपले बुद्धिकौशल्य सादर केले. आठवी पर्यंतच्या मुलांच्या गटात गोकुळधामच्या सिद्धेश देसाईने सेंट जॉन्स युनिवर्सल शाळेच्या आयाम अग्रवालविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला आणि आपले जेतेपद निश्चित केले. जर हा सामना सिद्धेशने गमावला असता तर त्याचे जेतेपदही हुकले असते. याच वयोगटात मुलींमध्ये रायन इंटरनॅशनलच्या स्वराली कोठेने सर्वच्या सर्व लढती जिंकत बाजी मारली.
आठवीपर्यंतच्या मुलांच्या गटात पहिल्या तीन बोर्डवरचे सामने बरोबरीत सुटले आणि पहिल्या चार खेळाडूंनी संयुक्तपणे आघाडी घेतली. पण शेवटचा डाव अनिर्णीत राहूनही पवईच्या पोदार शाळेच्या दक्ष जैनने सरस गुणांच्या आधारे अव्वल स्थान मिळविले. मुलींच्या गटात साईना नागरकट्टे आणि अग्रवाल आनयाने सहावा डाव जिंकला. दोघांचेही ५.५ गुण झाले होते, पण सरस गुणांमुळे साईना नागरकट्टे पहिली आली. आनयाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल.

 140 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.