घाटकोपरमधील खाजगी आणि महापालिकेच्या सर्व शाळेतील ५०३० विद्यार्थ्यांनी बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला.
मुंबई : महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारीत ‘जागतीक किर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ आज घाटकोपर पश्चीम येथील माणिकलाल मैदान व घाटकोपर पूर्व आचार्य अत्रे मैदान येथे एकूण चार गटामध्ये संपन्न झाली.
लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांना मुंबई आपली वाटते. ते प्रेमच आज मुलांनी आपल्या रंगाच्या कुंचल्यातून कागदावर उतरवले आहे. आज सकाळी घाटकोपरमधील खाजगी आणि महापालिकेच्या सर्व शाळेतील ५०३० विद्यार्थ्यांनी बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी किर्तीवर्धन किरतकुडवे (उपशिक्षणाधिकारी, परिमंडळ ६ बृहन्मुंबई महानगरपालिका) यांनी मार्गदर्शन केले. तसेच मालती टोनपे ( उपशिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका), ज्योती बकाने (अधिक्षीका, बृहन्मुंबई महानगरपालिका), आरती खेर (अधिक्षीका, बृहन्मुंबई महानगरपालिका), लक्ष्मण गोसावी (प्रशासकीय अधिकारी, एन. विभाग, घाटकोपर ) पांडुरंग भोये (विभाग निरीक्षक, एन विभाग) गोरक्षनाथ भवारी (विभाग निरीक्षक), अनिल सनेर (पर्यवेक्षक, शा.शि. विभाग,) आदी अधिकारी वर्गाने सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
स्पर्धा नियोजनपुर्वक संपन्न करण्यासाठी स्पर्धा प्रमुख प्रशासकीय अधिकारी (शाळा) लक्ष्मण गोसावी , प्रमोद महाजन, केंद्रप्रमुख (चित्रकला ) राजेंद्र जैसवार (मुख्याध्यापक), कैलास सरोदे (मुख्याध्यापक), रोशनी खोंडे (मुख्याध्यापक) तसेच इतर मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले होते.
256 total views, 1 views today