महाराष्ट्राच्या अपूर्वा गोरेला सुवर्णपदक  

२७ वी राष्ट्रीय् रोड रेस सायकलिंग स्पर्धा

सिन्नर : २७ व्या राष्ट्रीय रोड रेस स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी अपूर्वा गोरेने सुवर्ण पदकाची कमाई करत दिवसातील  महाराष्ट्राला पाहिलं सुवर्णपदक पटकावून दिलं . महिलांच्या ज्युनियर गटात  अपूर्वा गोरे बरोबर महाराष्ट्राच्या पूजा दानोलेनेही चांगली कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली. ११ जानेवारीपर्यंत चालणारी हि स्पर्धा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या समृध्दि महामार्गावर घेण्यात येत आहे.
महिलांच्या ६० किलोमीटर जुनिअर गटात झालेल्या या स्पर्धेत अपूर्वाने १ तास ४९ मिनिटे आणि ४३.५४७ सेकंदाची वेळ घेत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं . त्यासाठी तिने ३२.८१ किलोमीटर प्रतितास वेगाची नोंद करत तिने हि कामगिरी केली. अपूर्वाबरोबरच महाराष्ट्राच्या पूजा दानोलेसुद्धा १ तास ५१ मिनिटे आणि ४९.८३५ सेकंदाची नोंद करत  रौप्य पदक मिळालं. तामिळनाडूच्या कस्तुरीने पूजा ला चांगलीच फाइट दिली. मात्र सेकेंदाच्या शताऊंश फरकाने पूजाने रौप्य पदक आपल्या नावावर केलं. कस्तुरीने १ तास ५१ मिनिटे आणि ४९.८३६ सेकंदाची नोंद करत कांस्य पदकाची कमाई केली. महाराष्ट्र्राची संस्कृती खेसेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. इतर गटामध्ये महाराष्ट्राने  दिवसभरात १ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली.
स्पर्धेचे थेट प्रक्षेपण
२७ वी राष्ट्रीय रोड रेस हि स्पर्धा हि फेसबुक वरून लाईव्ह दाखवली जातेय.  राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अश्या प्रकारे कोणत्याही स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात येतंय. त्यामुळे हजारोंच्या संख्येने सायकल प्रेमी या स्पेर्धेचा आनंद लुटत आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या फेसबुक पेजवरून हे थेट प्रक्षेपण केले जात आहे

 297 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.