२७ वी राष्ट्रीय् रोड रेस सायकलिंग स्पर्धा
सिन्नर : २७ व्या राष्ट्रीय रोड रेस स्पर्धेतील दूसरा दिवस महाराष्ट्राच्या मुलींनी गाजवला. युथ विभागात महाराष्ट्राच्या श्रावणी परित, मानसी महाजन आणि नीम शुक्ला या त्रिकूटाने १५ किलोमीटर मध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या समृध्दि महामार्गावर या रोडरेस सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे.
मुलींच्या युथ विभागातील १५ किलोमीटरच्या टाईम ट्रायलमध्ये ३५.६३ किलोमीटर प्रतितास वेगाची नोंद महाराष्ट्राच्या संघाने नोंदविली. राजस्थानच्या टीमने २५ मिनिटे ३९.३२९ सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले तर कर्नाटकाने २६ मिनिटे ०१.५९० सेकंदाची वेळ देत कास्यपदक जिंकले.
इतर गटात मात्र पहिल्या दिवशी प्रमाणे दुसऱ्या दिवशीही राजस्थानने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. पुरुषांच्या पुरुषांच्या ४० किलोमीटर टाईम ट्रायल, महिलांच्या ३० किलोमीटर एलिट गटात, महिला व पुरुषांच्या २० किलोमीटर टीम ट्रायल जुनियर गटात तसंच सब जुनियर मुलींच्या आणि मुलांच्या १५ किलोमीटर युथ गटात राजस्थान ने सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
293 total views, 2 views today