राज्य मिनी ऑलिम्पिक स्पर्धा
कल्याण : पुण्यात बालेवाडी येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो या खेळात कल्याण बिर्ला कॉलेजची युवा खेळाडू आरुषी पाटीलने ४६ किलो वजनी गटात शानदार खेळ करून रौप्य पदकाला गवसणी घातली.
आरुषीने आपले सर्व सामने सहज जिंकताना प्रतिस्पर्धी कोल्हापूर, मुंबई उपनगर व नाशिक येथील खेळाडूंना सहज नमविले तर अंतिम सामन्यात सांगलीच्या मनस्वी भंडारी कडून निसाटा पराभव पत्करावा लागला. मनस्वी लहानपणापासून तायकांना खेळामध्ये आपले नशीब आजमावत असून तुम्ही आतापर्यंत अनेक जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धा गाजवले आहेत सध्या ती बी के.बिर्ला महाविद्यालयात शिकत आहे.
राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत तायक्वांदोत ठाण्याच्या वतीने पहिल पदक आरुषीने देण्याचा मान मिळवला. ठाणे संघाचे प्रशिक्षक रवींद्र गजरे व रोहित जाधव यांचे आणि तायक्वांदो खेळाचे स्पर्धा प्रमुख संदीप ओंबासे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
340 total views, 1 views today