नंदादीपला खोखोतही यश – प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
मुंबई : महात्मा गांधी विद्यामंदिरचे ४३ व्या प्रबोधन आंतरशालेय ाढाrडा महोत्सवात खो-खोत दुहेरी अजिंक्यपद पटकावण्याचे प्रयत्न नंदादीप विद्यालयाने पूर्ण होऊ दिले नाही. मुलींच्या गटात आयईएस न्यू इंग्लिश शाळेचा डावाने धुव्वा उडवणाऱ्या महात्मा गांधी विद्यामंदिरला मुलांच्या गटात अटीतटीच्या अंतिम लढतीत नंदादीप विद्यालयाकडून हार सहन करावी लागली.
कालच नंदादीपच्या मुलींनी कबड्डी स्पर्धेत यश मिळविले होते. तसेच खोखोत त्यांच्या मुलांनी शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी विद्यामंदिरचा २ गुण आणि ४० सेकंद राखून पराभव करण्याचा करिश्मा केला. ओमकार निवळे आणि अर्जुन शेजारेच्या वेगवान खेळामुळे नंदादीपला आपल्dया प्रतिस्पर्धी संघाचे ७ विकेट टिपता आले तर गांधी संघाला दोन्ही डावात प्रत्येकी ६ विकेटच मिळविता आल्या. त्यामुळे चौथ्या डावात नंदादीपला केवळ सहाच विकेट टिपायचे होते. ते लक्ष्य त्यांनी सामना संपायच्या एक मिनीट आधीच पूर्ण करीत आपले जेतेपद निश्चित केले. महात्मा गांधी संघाला वेदांत कांबळे आणि कार्तिक चांदणेच्या सुरेख खेळाचा फायदा उठवता आला नाही. त्यामुळे नंदादीपने वंशिक सरतेज, प्रणित सोगम यांच्या दमदार बचावामुळे जेतेपदाची लढत जिंकली.
मुलींच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी विद्यामंदिरसमोर आईएएस न्यू इंग्लिश शाळेचे काहीएक चालले नाही. महात्माच्या दिव्या गायकवाडने ५.५० सेंकद बचावात्मक डाव खेळून पहिला डाव गाजवला तर दुसऱ्या डावांत ती ८.१० मिनीटे धावली. या बचावापुढे आयईएस काहीच करू शकला. दोन्ही डावांत त्यांना एकेकच गडी बाद करता आले. परिणामता महात्मा गांधीच्या एका डावातील पाच विकेट्सना ते दोन डावांतही गाठू शकले नाही. त्यामुळे महात्मा गांधीच्या मुलींनी डाव आणि २ विकेट्सने खणखणीत विजय नोंदविता आले.
त्याअगोदर मुलींच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अ. भि गोरेगावकर संघाने महात्मा गांधीचा २ गुणांनी पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात आयईएसने गोकुळधाम विद्यालयाचा ३ गुणांनी पराभव केला. मुलांच्या गटात नंदादीपने सिद्धार्थ नगर हायस्कूलचा डावाने धुव्वा उडवला.महात्मा गांधी विद्यामंदिराने गोरेगावकर संघाचाही डावाने धुव्वा उडवला. या स्पर्धेत मुलांचे १६ तर मुलींचे १० संघ खेळले होते.
334 total views, 1 views today