हृदय, हिरणमयी अव्वल

दुसरीपर्यंतच्या गटात मेधांश, गिरीशा पहिले ,४३ वा प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव

मुंबई : ४३ व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात पाचवीपर्यंतच्या मुलांच्या गटात आर्य विद्यामंदिरच्या हृदय मणियारने सहाही सामने जिंकत गटात बाजी मारली. मुलींच्या गटात जुहू आर्य विद्यामंदिरच्या हिरणमयी कुलकर्णीने सर्वाधिक पाच गुणांची कमाई करीत मुलींच्या गटात आपले जेतेपद निश्चित केले. दुसरीपर्यंतच्या गटात रुस्तमजी शाळेच्या मेधांश पुजारी आणि ठाकूरच्या गिरीशा पै हिने सर्वाधिक गुण मिळवित गटाचे जेतेपद पटकावले.
प्रबोधनच्या आंतरशालेय क्री महोत्सवाच्या बुद्धिबळ क्रीडा प्रकारात तब्बल २७५ खेळाडूंनी विविध गटात आपला सहभाग नोंदविला. सर्व स्पर्धा पाच आणि सहा फेऱयांत खेळविल्या गेल्या. पाचवी इयत्तेपर्यंतच्या मुलांच्या गटात हृदय मणियारने सर्वच्या सर्व लढती सहज जिंकल्या. शेवटच्या सहाव्या फेरीत हृदय आणि शौर्य शाह यांनी सलग पाचही फेऱया जिंकून पाच गुणांसह संयुक्तपणे आघाडी घेतली होती. जेतेपदाच्या लढतीत हृदय आणि शौर्य यांच्यात चांगलीच चकमक उडाली. ज्यात हृदय काकणभर सरस ठरला आणि त्याने शौर्यवर मात करीत या गटात बाजी मारली. हिरणमयी कुलकर्णीनेही नॉनस्टॉप सर्व सामने जिंकत मुलींच्या गटात आपले अव्वल स्थान कायम राखले.
आंबोडकर भावंडांची कमाल
आर्यन पुरलेल्या मल्लखांबात पहिला तर पूर्वा दोरीच्या मल्लखांबात अव्वल
शालेय मल्लखांबात स्वामी विवेकानंद शाळेच्या आंबोडकर भाऊ- बहिणींनी कमाल केली. १६ वर्षाखालील मुलांच्या गटात आर्यन आंबोडकर सर्वाधिक ८ गुण मिळवित पहिला आला तर १० वर्षाखालील मुलींच्या दोरीच्या मल्लखांबात पूर्वा आंबोडकरने अप्रतिम सादरीकरण करीत अव्वल स्थान पटकावले. एकंदर सहा गटात झालेल्या या स्पर्धांत तब्बल १३५ शालेय मुलांनी आपले कौशल्य सादर केले.

 295 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.