२७व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत ३१ राज्य आणि क्रीडा मंडळांचे संघ होणार सहभागी.
मुंबई : “भारतात सायकालिंगपटू तयार होत आहेत. पण त्यांना पाहीजे त्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने खेळाडूंना जागतिक स्तरावर मोठी कामगिरी करता येत नाहीए. सरकारने यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे सायकालिंग ट्रॅक उपलब्ध करून देणे गरजेचे आहे,” असं मत सायकालिंग फेडरेशन ऑफ आशिया चे सेक्रेटरी जनरल ओंकार सिंग यांनी व्यक्त केले आहे. नाशिकच्या मध्ये २७व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सिंग बोलत होते. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोशिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने २७व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ते ११ जानेवारी दरम्यान सिन्नर, जिल्हा नाशिक येथे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत देशातील ३१ राज्य आणि क्रीडा मंडळाचे संघ सहभागी होत असून या स्पर्धेमधून राष्ट्रीय अकॅडमीसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
“२७व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे समृद्धी मार्गामधला ५३४ ते ५६५ किलोमीटरचा भाग स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धेचं आयोजन सोप झालंय,” असं मत सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव प्रताप जाधव यांनी व्यक्त केलं आहे. विविध वयोगटात ट्रॅक,एमटीबी तसेच रोडवर विविध अंतराच्या स्पर्धांचे आयोजन करणे, या प्रकारात राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करणे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी महाराष्ट्राचा संघ निवडणे या संघाला प्रशिक्षण देणे, खेळाडूंना विविध सवलती पुरवणे, निरनिराळ्या राज्य-राष्ट्रीय पुरस्कारासाठी खेळाडूंची शिफारस करणे, सायकलपटूंच्या रोजगारासाठी विविध स्तरावर पाठपूरावा करणे इत्यादी कार्य सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र नेहमीच करत आली आहे. सायकलिंग खेळामधील देशपातळीवरील सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) या सर्वोच्च फेडरेशनची मान्यता असलेली ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे.
६ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ५ आणि ६ जानेवारीला सहभागी संघ शिर्डी येथे दाखल होईल आणि ७ जानेवारीपासून स्पर्धेला आरंभ होईल. यात वेगवेगळ्या गटात स्पर्धा भरवल्या जाणार आहेत. स्पर्धेचं उद्घाटन सायकालिंग फेडरेशन ऑफ आशिया चे सेक्रेटरी जनरल ओंकार सिंग यांच्या हस्ते होणार आहे.
280 total views, 1 views today