रविंद्र खर्डीकर यांनी ऐन विशीत आपल्या पत्रकारीतेची सुरुवात एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातुन केली होती.सध्या ते डिजीटल ठाणे या स्थानिक वृत्तवाहिनीचे संपादक म्हणुन कार्यरत होते.
ठाणे : ठाणे शहरातील युवा पत्रकार रविंद्र नारायण खर्डीकर यांचे मंगळवारी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. दुर्धर कर्करोगाशी लढताना वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दिवंगत रविंद्र यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,आई, भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे.ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रसंगी, पत्रकार बांधव तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सदस्य असलेले रविंद्र खर्डीकर यांनी ऐन विशीत आपल्या पत्रकारीतेची सुरुवात एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातुन केली होती.सध्या ते डिजीटल ठाणे या स्थानिक वृत्तवाहिनीचे संपादक म्हणुन कार्यरत होते.क्षुल्लक आजाराचे निमित्त होऊन तपासणीअंती कर्करोगाचे निदान झाल्याने त्यांच्यावर गेल्या काही दिवसापासुन बेथनी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र,मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
8,432 total views, 1 views today